वणीत स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ जंगी शंकर पट.

0
322

वणीत स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर स्मृती प्रित्यर्थ भव्य शंकरपट, दोन गटात स्पर्धेची विभागणी.

राजकीय दिग्गजांची उपस्थिती व  शंकर पट निमित्ताने “हंबरते गाय वासराची ” वडसा येथील कलावंतांची नाट्याची मेजवानी.

लोकवाणी जागर- वृत्त.

वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी २० फेब्रुवारीपासून जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवस हा शंकरपट रंगणार आहे. स्व. खा. बाळू धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या पुढाकारातून या विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. यात लाखोंची बक्षिसे ठेवण्यातआले असून राज्यभरातील सुमारे १५० ते २०० बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा शंकरपट दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. एका गटात पूर्णवाढ झालेली बैलजोडी तर तर दुसऱ्या गटात तरुण (गाहे ) बैलांची जोडी सहभागी होणार आहे. यात नाशिक, पुणे, नागपूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव इत्यादी ठिकाणाहून बैलजोडी येणार आहे. तर वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा ही विशेष स्पर्धा राहणार आहेत. शंकर पटात येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन व्हावे म्हणून वडसा येथील कलावंतांचेहंबरते गाय वासराची “ या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

शंकरपटात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक संजय खाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here