मारेगाव तालुक्यातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व जिवन पाटील कापसे यांचे निधन.
आनंद नक्षणे – मारेगाव.
तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तीमत्व जिवन पाटील कापसे, मारेगांव यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आज सकाळी ८:३० वाजता चंद्रपुर येथे हॉस्पीटल मध्ये निधन झाले.
जिवन पाटील हे दिर्घ काळ जिल्हा परिषद यवतमाळ चे सदस्य पदी होते.तसेच ते शेतकरी शिक्षण संस्था मारेगांव चे आजीवन अध्यक्ष होते ज्या अंतर्गत मारेगांव येथे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय संचालीत केले जाते.
या भुमिकेपेक्षाही नि: स्वार्थी, साधे सरळ राजकारणी अशी त्यांची ओळख शेवटपर्यंत लोकांमध्ये कायम राहीली. तत्वनिष्ठ राजकारणाचा जो काळ आपल्या वाट्याला आला होता, त्या काळाचे जिवन पाटील हे साक्षीदार होते. अनेक लोकांचे जीवन सफल होईल असे पदाचा वापर करून समाजामध्ये आपली छाप सोडणारे, व दुसऱ्यांसाठी जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व. आजचे उबग आणणारे राजकीय वातावरण पाहीले तर जिवन पाटील हे तत्वांसाठी जगणाऱ्या राजकीय पिढीचे प्रतिनिधी म्हणता येईल.
त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार आहे.राजकीय क्षेत्रात वावरून सुद्धा अराजकीय आणि सामाजिक ओळख बनलेले जिवन पाटील कापसे या लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वाला आज देवज्ञा झाली.
मारेगाव येथील प्रतिष्ठित आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व मारेगाव शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव जनसामान्यांच्या अंतिम दर्शनासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे आज दुपारी बारा वाजता ठेवण्यात आले होते. आता पर्थिव मारेगाव येथील घरी आणण्यात आले आहे.
आज मारेगाव येथील त्यांच्या शेतात 4 वाजता त्यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. लोकवाणी जागर परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली.