कुंभा नारीशक्ती सरसावल्या…
आरोपीला तडीपार करा.. महिला धडकल्या ठाण्यावर.
कुंभा परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट.. गुन्हेगारी पार्श्वभूमी डोकाऊ पाहत आहे.
आनंद नक्षणे – मारेगाव.
शेतात जात असताना एकटेपणाचा फायदा घेत महिलेचा विनयभंग करणाऱ्याच्या निषेधार्थ व घटनेतील आरोपीवर कडक कारवाई करून तडीपार करण्याची मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी महिलांची लाक्षणिक उपस्थिती होती.
कुंभा येथील आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्या शिरावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. सदर आरोपी हा कायदा व सुव्यवस्थेला नेहमीच भंग करतो. यापूर्वीसुद्धा संबंधित आरोपीवर महिलाविषयक अनेक गुन्हे दाखला आहे. सामूहिक अत्याचार प्रकरणातही तो आरोपी आहेत. त्याचबरोबर काही नागरिकाच्या घरात घुसून जीवघेणे हल्ल्याचा सुद्धा गुन्हे त्याच्यावर आहेत.
अशातच दिनांक 16 फेब्रुवारी रोजी गावातील महिला शेतात एकटी जात असतांना पाहत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने महिला वर्गामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोपीला अटक होताच आक्रमक महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या.
यावेळी सदर आरोपीवर कडक कारवाई करून तडीपार करावे असे असे निवेदन तहसीलदार, ठाणेदार यांना देण्यात आले. यावेळी सुषमा ठेपाले, वर्षा महाजन, कविता चौधरी, सुनीता पांढरे ,शारदा राऊत ,सुवर्णा घोटेकर, शांता चौधरी ,रंजना येडे ,वैशाली अवताडे, सोनू मांडवकर ,लता डुकरे, कांता घागी, वर्षा बोथले, सुरेखा लोणबले ,पूजा ठाकरे, पुष्पा चौधरी ,सुचिता महाजन सह आदी महीला उपस्थित होत्या.
ठाणेदाराने महिलांना समजावून सांगितले न्यायालयात प्रकरण असल्याने न्यायालयात बाजू मांडू…
शिरावर महिला अत्याचारासह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर कडक कारवाई करून तडीपार करण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना ठाणेदार जनार्दन खंडेराव यांनी न्यायालयात प्रकरण असल्याने न्यायालयाची बाजू ऐकून घेतल्यानंतरच कार्यवाही करता येईल असे सांगितले. मात्र न्यायालयात निवेदन द्या नाही तर न्यायालयातील आवक जावक ला द्या असे सांगितले. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
कुंभा परिसरात अवैध धंदे जोमात..
कुंभा परिसरात अवैध दारू, मटका , जुगार व कोंबड बाजार अशा पद्धतीचे सारे अवैध धंदे सुरू असल्याने परिसरात गुंड प्रवृत्तीचा लोकांचा दिवसाढवळ्या वावर सुरू असल्याच्या चर्चा आलेल्या महिला दबक्या आवाजात बोलत होत्या. अर्थात ह्या गुंड प्रवृत्तीच्या इसमाला कोणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे कोडेच निर्माण झाले आहे.