शिरपूर ठाणेदार माधव शिंदे,
वणी तालुक्यातील महत्वाचे पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या शिरपूरचे ठाणेदार म्हणून सपोनि माधव शिंदे यांना आदेशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील हेविवेट ठाणे म्हणून शिरपूर ची ओळख आहे. या परिसरात अनेक अवैद्य व्यवसाय आहे, यावर आळा बसवून धंदे बंद करण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले आहे .
शिरपूर पोलीस ठाण्यात सहा महिन्या पूर्वी संजय राठोड यांनी ठाणेदार पदाचे सूत्र हाती घेतले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली अमरावती ला करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी वणी ठाण्यात कार्यरत असलेले API माधव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून होणारी गोवंश, सुगंधित तंबाखू तस्करी व कोळसा चोरी मोठ्या, मटका , जुगार मोठया प्रमाणात वाढला आहे त्यावर आळा घालून ते बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी जाबाज अधिकारी म्हणून शिंदे ना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील तस्करांचे पुरते धाबे दणाणले आहे.