रेती तस्कर मुजोर, डेपोवरची रेती सरळ विक्रीला..

0
656

सरकारी रेतीची चोरून वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर ला पकडले, पुढील कारवाई कडे लक्ष…

ना.तहसिलदार खिरेकर, तलाठी उराडे यांची प्रशंसनीय कारवाई, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षेत कारवाईचा चेंडू.

ड्रायव्हरला अटक करून पी सी आर घेतल्यास….

लोकवाणी जागर वृत्त.

रेती तस्कर आणि महसूल प्रशासनाचे सबंध चोर पोलीस च्या खेळासारखे झाले आहे. सरकारने रेती तस्करी मधील भोंगळ गोंधळ थांबविण्यासाठी रेती घाटातून रेती काढून, ती डेपो वरती केवळ स्टॉक करण्याचे काम कंत्राटदारांना दिल्यामुळे, रेती तस्करीवर आळा बसेल असेच चित्र निर्माण झाले होते. परंतु रेती तस्कर हे सरळ घाटातून रेती काढून परस्पर विक्री करण्याचे काम महसूल प्रशासनाला न जुमानता करीत असल्याचे सदर कारवाई वरून दिसून येत आहे.

हल्लीच्या काळात वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर अधिकाऱ्यांना जिव मुठीत धरून कारवाई करावी लागत असल्याचे अनेक घटनेवरुन दिसून येत आहे. तरीही अधिकारी आपले कर्तव्य म्हणून जिवाची पर्वा न करता कारवाई करतच असतात. अशीच एक कारवाई अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर वर आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वणी शहरात करण्यात आली आहे.
१ मार्च २०२४ ला सायंकाळी निळापुर ब्राह्मणी मार्गे वणी कडे एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याची माहिती येथिल उपविभागीय अधिकारी यांना मिळाली. तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे नगर संयोजक संतोष लक्षट्टीवार यांनी सुद्धा रेती घाट लिलावधारक रेती घाट ताब्यात येण्याच्या आधीच रेती घाटावरुन रेतीची उचल करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना दिली होती. माहिती मिळताच कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांना कारवाईचे आदेश देण्यात आले. आदेश मिळताच ना.तहसिलदार खिरेकर व तलाठी महेश उराडे यांनी शहरातील विराणी हॉल जवळ निळापूर ब्राह्मणी मार्गे जैन ले आऊट कडून एक ट्रॅक्टर क्रमांक एम एच -29 व्हि.1903 हे अवैधरित्या वाळू घेऊन येत असल्याचे दिसून आले. सदर ट्रक्टर ला थांबवून पाहणी केली असता ट्रॅक्टर मध्ये अंदाजे एक ब्रास वाळू वाहतूक करत असल्याचे दिसून आले. ट्रक्टर चालकास सदर वाळू बाबत विचारले असता आधी उडवाउडवीची उत्तरे दिली आणी ट्रॅक्टर वळून पळून जाण्याचा प्रयत्न करताच ना. तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी जिवाची पर्वा न करता आपले वाहन सदर ट्रक्टर समोर लावून ट्रक्टर थांबविले आणि कारवाई करिता तहसील कार्यालयासमोर लावण्यात आले आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालकास विचारले असता सदर ट्रक्टर  हो खोटे नाव सांगून मालकीचा असल्याचे त्यांनी सांगितले होते. वाहतूक विभागाकडून लवकरच ट्रॅक्टर मालकाचे नाव समोर येईल. सदर ट्रक्टर वर कारवाई करून पंचनामा करण्यात आला असून दंडात्मक कारवाई सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षेत कारवाईचा चेंडू, अर्धवट कारवाई रेती तस्करीचे मूळ.

परंतु रेती तस्करीचे समूळ उच्चाटन करायचे असेल, सरकारची रेती संदर्भात असलेली  योजना लोकप्रिय करायची असेल तर प्रशासनाला वर पांगी कार्यवाही न करता रेती घाट  संदर्भात असणाऱ्या अटी शर्थीचे खुलेआम उलंघन  करून नियमांचे भंग करणाऱ्या नियमांतर्गत जर कार्यवाही करून, या प्रकरणात ट्रॅक्टर ड्रायव्हरला अटक करून, पीसीआर घेतला तर सत्य बाहेर येईल, आणि रेती तस्करीचा पर्दाफाश होईल व कारवाईला बळ मिळेल, रेती तस्करावर धाक निर्माण होईल व रेती तस्करिवर आळा बसेल अशी चर्चा वणी शहरात सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here