रुद्राक्ष वनाचे भूमिपूजन,वणीकरांसाठी हक्काचे पर्यटनस्थळ.

0
878

वणी जवळील निंबाळा येथे होणार रुद्राक्ष बन उद्यान, वणी परिसरातील जनतेसाठी हक्काचे पर्यटनस्थळ.

 ना. मुनगंटीवार यांनी शिवपुराणात दिलेला शब्द केला पूर्ण, निंबाळा, सोमनाळा पाखडगाव परिसराचे भाग्य उजळणार असल्याची रवी बेलुरकर यांची माहिती.

लोकवाणी जागर.

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांच्या प्रस्तावानुसार वणी जवळील निंबाळा (रोड) येथील वन विभागामध्ये वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वणीकरांना दिलेल्या शब्दानुसार रुद्राक्ष वन ( शिवबन) उद्यान साकारणार आहे. या प्रस्तावाला शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

वणी येथे मागील महिन्यात पार पडलेल्या शिवपुराण कथा कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वणी जवळ शिवबन तयार करण्याची घोषणा केली होती. या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग अमरावती यांनीही तांत्रिक सहमती दिली आहे.

वणी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबाळा येथे प्रस्तावित रुद्राक्ष वनासाठी 11 कोटी 97 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या उद्यानात रुद्राक्ष वनस्पतीसह, बेल व इतर बहुउपयोगी वनस्पती व फुलझाडे लावून सौंदयीकरण केले जाणार आहे. या सोबतच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन केंद्र, बालोद्यान, विकसीत केले जाणार आहे.
या रुद्राक्ष वणामुळे या परिसरातील वातावरण शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या परिसरातील नागरिकांना पर्यटनासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पाठपुराव्यातून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे एक मोठे केंद्र निर्माण होणार आहे. अशी माहिती चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे विस्तारक रवी बेलूरकर यांनी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here