चंद्रपूर लोकसभा 2024 ची निवडणूक. जाणून घेऊया कोणा, कोणाला मिळणार तिकीटाची लॉटरी. भाजप व काँग्रेस पक्षाची प्रमुख लढत.
तिकीट वाटपावरून उमेदवारांत घमासान तर जनतेत प्रचंड उत्सुकता.
हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार, अशोक जीवतोडे यापैकी एक होणार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचा खासदार..
राजू तूरणकर – संपादक लोकवाणी जागर.
चंद्रपूर,वणी ,आर्णी हा लोकसभा मतदार संघ महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधील ४ व यवतमाळ जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
लोकसभा क्षेत्रात येणारे विधानसभा मतदारसंघ.
चंद्रपूर जिल्हा राजुरा विधानसभा मतदारसंघ, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ,बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ, वरोरा विधानसभा मतदारसंघ, यवतमाळ जिल्हातील वणी विधानसभा मतदारसंघ, केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघ यातून होणाऱ्या निवडणुकीत मागील 2019 निवडणुकीत काँग्रेसचे स्वर्गीय बाळू भाऊ धानोरकर हे प्रतिनिधित्व करीत होते.
11 एप्रिल 2019 या वर्षी झालेल्या चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी बाजी मारली होती. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघ हा देशात गाजल्याने मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली होती. या मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर , काँग्रेसकडून बाळू धानोरकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे यांच्यात प्रमुख लढत झाली होती . मात्र मतदारसंघात भाजप-काँग्रेस यांच्यात थेट लढत होती.
अपक्ष अॅड राजेंद्र महाडोळे हे केवळ एक लाख चे वर मतदान घेवून तिसऱ्या स्थानावर राहिले होते.
तर काँगेस साठी हा निकाल बाळू धानोरकर यांच्या रूपाने एकमेव सीट अख्या महाराष्ट्र राज्याचे काँगेस प्रतिनिधी ठरले होते.
बाळू उर्फ सुरेश नारायण धानोरकर काँग्रेस 5,59,507 एकूण मतदानाच्या 45.6 इतके मते मिळाली होती, तर भाजप शिवसेनेचे हंसराज अहिर यांना 5,14,744 मतदानाच्या 41.95 टक्के मते मिळाली होती. 44763 मतांनी अहिर यांना पराभव पत्करावा लागला होता.
महाराष्ट्रातील राजकीय दृष्या रंगतदार लढत म्हणून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा लढतीकडे पाहिले जाते. शिवसेनेतून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आणि काँग्रेसच्या केंद्रीय यादीत नाव नसताना ऐनवेळी तिकीट मिळालेल्या बाळू धानोरकर यांच्या आव्हानाने ही जागा चर्चेत राहिली. मात्र बाळू धानोरकर यांचे निधन झाल्याने मतदार संघासाठी काँग्रेस समोर कडवे आव्हान आहे.
दावेदार कोण कोण, कुणाला लागणार तिकीटाची लॉटरी.
2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत स्वर्गीय बाळू धानोरकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर ह्या विद्यमान वरोरा मतदार संघाच्या आमदार आहेत. त्यामुळे त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. त्यांच्याच पक्षाचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एका दूरचित्रवाणीवर चंद्रपुर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे पक्षात प्रतिभा धानोरकर यांना स्पर्धक असल्याने काँग्रेस पक्षाची सीट वाटपाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
2019 मध्ये पंतप्रधान मोदींची प्रचंड लाट असताना बाळू धानोरकर यांच्या राजकीय खेळीमुळे भाजपला या मतदार संघात पराभव पत्करावा पराभव लागला होता.
हंसराज अहिर हे अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व, दांडगा जनसंपर्क प्रशासनावर वचक असलेले व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. आजही त्यांचा राजकीय प्रभाव कायम असून भाजपचे ते दमदार प्रतिनिधी ठरू शकते.
सुधीर मुनगंटीवार राज्याचे वनमंत्री आहे.जबरदस्त राजकीय इच्छा शक्ती असलेले,दिलेला शब्द पाळण्यााठी धडपड करणारे व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात ते लोकप्रिय आहे. त्यांच्या हस्ते वणी विधानसभा क्षेत्रात शिवपुराण कथा स्थळी महादेव वणाचा दिलेला शब्द एका महिन्यात पूर्ण होत असून, लवकरच निंबाळा जवळ रुद्राक्ष वणाचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे ते सुद्धा प्रबळ दावेदार आहेत. भाजप कडूनच विदर्भातील ओ बी सी प्रवर्गाच्या हक्कासाठी सातत्याने झटणारे अशोक जीवतोड हे प्रबळ दावेदार आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क असून जनता शिक्षण संस्था चंद्रपूर च्या माध्यमातून अनेक वर्षापासून उत्तम शैक्षणिक कार्य सुरू असल्याने त्यांच्या पाठीशी हजारो चाहता कर्मचारी वर्ग आहे. ओबीसी आंदोनलातील कार्यकर्ते नेते व जातीय समिरकरण ही त्यांची जमेची बाजू असल्याने ते प्रबळ दावेदार मानल्या जात असून बिजेपी पक्ष सीटा वाटप करतांना गांभीर्याने विचार करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस हेच खरे प्रतिस्पर्धी असून तिकीट वाटपाबाबत उमेदवारांत प्रचंड रस्सीखेच सुरू असून जनतेच्या मनात प्रचंड उत्सुकता असली तरी वरील पाच पैकी एक चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचे प्रतिनिधित्व करणार हे जवळपास निश्चित मानले जाते आहे.