फाले लेआऊट वणी मध्ये चोरांनी पळून जाण्या साठी केला युवकावर हल्ला.

0
1851

फाले लेआऊट मध्ये मध्यरात्री चोरी, साठ हजार नगदी तर पाच तोळे सोन्यावर चोरांनी मारला डल्ला.

चोर आणि युवकात थरार, गेट उघडताच घराबाहेर पडले चोर, धारदार पेचकस नी वार करण्याचा प्रयत्न, अनर्थ टळला.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

वणी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील फाले लेआऊट येथील राजीव दादाजी झाडे हे काल संध्याकाळी चंद्रपूरला गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरांनी घरचा दरवाजा फोडून साठ हजार रुपये नगदी तर पाच तोळे सोने चोरून नेल्याची खळबळजनक घटना 12 मार्च 24 आज रात्री 2.25 ला घडली आहे.

सविस्तर वृत्त : फाले लेआऊट मधील राजीव झाडे हे काल आपल्या मुलीला सासरी चंद्रपूरला सायंकाळी 6.30 ला सोडण्यासाठी गेले व शेजारी राहणारे जैन लेआऊट येथील पुतणे रोमल बोबडे याला घरी झोपावयास सांगितले, रोमल हा उशीरा घरून २.२३ ला आला व लोखंडी गेट चे कुलूप उघडुन आत प्रवेश करणार तोच घरात चोरी करून बाहेर निघण्यासाठी पडलेले चोर गेट ढकलून रोमल ला धारदार पेचकस मारल्याने अनपेक्षित झालेला हल्ला पाहून रोमल खाली पडला व चोर पळून गेले. लगेच रोमल उठून चोरांच्या मागे धावायला लागला परंतु त्यांना पकडण्यासाठी तो अपयशी ठरला, व चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. हा सर्व थरार समोरच्या घरील तिसऱ्या डोळ्यात कैद झाला आहे. पोलीस प्रशासनाने रात्रीच दखल घेवून उपविभागीय पोलिस अधिकारी हे स्वतः घटना स्थळी येवून गेले व घटनेला गांभीर्याने घेवून पुढील तपास करीत आहे.

धारधार शस्त्रांनी हल्ला केला असता तर.

रोमल हा बेसावध होता, चोरांनी पळून जाण्यासाठी जर धारधार शस्त्रांनी हल्ला केला असता ही चोरी रोमल च्या जीवावर बेतली असती हे नक्की, वणी शहरात चोऱ्या ह्या नित्तनेमाच्या झाल्या आहेत, त्यामुळे ह्या चोरीचा शोध घेणे पोलिसांसाठी फार मोठे आव्हान असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here