मारेगाव पोलीस ठाण्यात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रामाणिक तेचा सुखद प्रसंग.

0
211

मारेगाव पोलीस वेलफेअर पेट्रोलपंपावर माणुसकीचे दर्शन.

तिसऱ्या डोळ्याच्या आधारे कर्तव्यदक्ष ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या उपस्थितीत मारेगाव ठाण्याने अनुभवला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रामाणिकतेचा सुखद प्रसंग.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

आजच्या स्वार्थी कलीयुगात सुद्धा प्रामाणीकपणा जीवंत असल्याचा प्रत्यय महाशिवरात्री सणाच्या पर्वावर मारेगांव येथील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपावर आला आहे.
कोलगांव येथील एकशेतकरी ग्राहक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी टू व्हीलर घेऊन पेट्रोल भरताना अनावधाने खिश्यातील प्लॉस्टीक मधिल साडे अकरा हजार पडले, ते पंपावर असलेल्या एका कर्मचाऱ्याला सापडले व ते पैसे कुणाचे याचा शोध CCTV कॅमेऱ्यात घेऊन ग्राहकांना प्रामाणीक पणे पैसे परत केल्याने, पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोलगांव येथील शेतकरी पुत्र प्रकाश रघुनाथ सुर महाशिवरात्री उत्सवाच्या दिवशी येथील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी सकाळच्या सुमारात आले असता जवळ असलेल्या १२ हजार रुपयातील गड्डीतून ५०० रुपयाची नोट पेट्रोल भरण्यासाठी काढली व घाईघाईत उर्वरीत साडेअकरा हजार प्लॉस्टीक मध्ये गुंडाळून पॅन्टच्या साईड पॉकेट मध्ये ठेवत असताना खाली पडले व पेट्रोल भरून ग्राहक निघून गेले, ते पडलेले साडेअकरा हजार रुपयाचे बंडल प्लॉस्टीक मध्ये असल्याने प्रथम कुणाचाही लक्षात आले नाही, त्यावेळी पेट्रोल पंपावर कार्यरत असलेले प्रविण पोटे , पंकज शंदरे व परवेज पंधरे यांना ते प्लॉस्टीक पडलेले दिसले त्यांनी ते उचलून घेतले तर त्यात साडे अकरा हजार असल्याचे निदर्शनात आले , ते पैसे कुणाचे असा प्रश्न संबंधीत कर्मचाऱ्याना पडला , ही हकीगत तेथील कार्यरत व्यवस्थापक सुलभ उईके यांना सांगीतली, त्यांनी ते पैसे ज्यांचे आहे त्यांना मिळावे यासाठी CCTV यंत्रणेत शोध घेतला असता कोलगांव येथील शेतकरी पुत्र प्रकाश सुर यांचे असल्याची खात्री झाली त्यांना बोलावून मारेगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शंकर पांचाळ यांचे हस्ते प्रामाणिक पणे परत केले या घटनेने आमच्या स्वार्थी युगात प्रामाणिक पणा आजही जीवंत असल्याचा प्रत्येय या घटनेने आला , या प्रामाणिकतेसाठी मारेगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकरराव पांचाळ यांनी त्या प्रामाणिक कर्मचाऱ्याचे कौतुक केले तर ग्राहकांनी आपल्या जवळची रोख रक्कम काळजी पूर्वक जपून ठेवावी असा सल्ला दिला.  पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपावरील मॅनेजर पोलीस जमादार रामकृष्ण वेटे, मोहन कुडमेथे व विठ्ठल बुरुजवाडे, जमादार भालचंद्र मांडवकर, गुप्तचर विभागाचे रजनीकांत पाटील यांच्या उपस्थित प्रकाश सुर याला  पोलीस निरिक्षक शंकरराव पांचाळ यांच्या हस्ते रक्कम देण्यात आली.

महाशिवरात्रीच्या दिवशी प्रकाश चे पैसे पडावे आणि त्यादिवशी भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्यात ती घटना कैद व्हावी , ते पैसे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या हस्ते परत प्रकाशला मिळावे व प्रकाशच्या जीवनात थोड्या वेळासाठी पसरलेला अंधार पुन्हा ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या रूपाने नाहिसा व्हावा ही घटणा त्या महाशिवरात्री दिवसाचे महत्त्व सांगून जाते हे नक्की…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here