आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्येच खळबळ.

0
2883

प्रतिभा धानोरकर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्येच खळबळ.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रतिभा धानोरकर यांचा गंभीर आरोप. संताप की राजकीय स्टंट.
लोकसभा निवडणुक आढावा मतदारसंघांचा २०२४.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

“त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला, आता ते…”, आमदार प्रतिभा धानोरकरांचा काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाल्या…
आमदार प्रतिभा धानोरकर  काँग्रेसच्या तिकीटावरच आगामी लोकसभेची निवडणूक लढणार आहे.

मात्र प्रतिभा धानोरकर यांनी पक्षांतर्गत वादांवरच भाष्य करून वाद निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांमधील धुसफूस पाहायला मिळत आहे. अशातच चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी या मतदारसंघाचे माजी दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि आमदार प्रतिभा धानोरकर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला पक्षातील इतरही नेते या जागेसाठी पक्षश्रेष्ठींचं मन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवारदेखील या जागेसाठी इच्छूक आहेत. शिवानी वड्डेटीवार यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विजय वडेट्टीवार हे थेट दिल्लीतून मोर्चेबांधणी करत आहेत. तर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुंबई, दिल्ली आणि स्थानिक अशा तिन्ही आघाड्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, प्रतिभा धानोकर यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघातही पक्षातील काही नेत्यांकडून विरोध सुरू असल्याचं बोललं जात आहे. अशातच प्रतिभा धानोकर यांनी पक्षांतर्गत वादांवर भाष्य केलं. तसेच त्यांना पक्षातील नेत्यांकडून होणाऱ्या विरोधाची माहिती दिली. आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, आमच्या पक्षात असे अनेक लोक आहेत, जे सतत माझा विरोध करत आहेत. माझे पती दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यापासून मला पक्षातील काही लोक विरोध करत आहेत. त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला, आता ते माझ्याही मागे लागले आहेत. या संघर्षात एक जीव गेला आहे. आता दुसरा जीव जाणार नाही याची काळजी मी घेईन. हे करत असताना मी नक्कीच पक्षाची ध्येयधोरणं सांभाळेन. तसेच पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय अंतिम असेल आणि तो निर्णय मला मान्य असेल.

 निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्याच पक्षातील लोकांवर बोट उचलल्यामुळे पक्षात सर्व आलबेल तर नाहीच व लोकसभेची पायरी अवघड असल्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करून कामी लागण्याची एकप्रकारे आवाहन केले आहे. मात्र या आरोपाचे काय परिणाम होईल हे येणारा काळच ठरवेल हे नक्की.

  स्वपक्षावर गंभीर आरोप , काय तथ्य…

हा गंभीर आरोप एन निवडणुकीच्या तोंडावर शिट वाटप होण्यापूर्वी केल्याने चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जागावाटप वरून चाललेला अंतर्गत वाद, यातून होणाऱ्या त्रासातून प्रतिभाताईंनी नैराश्यातून तर आरोप केले नसावे, की स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून खळबळ उडवून देणारे वक्तव्य करून, राजकारणात राजकीय स्टंट निर्माण करण्यासाठी ही राजकीय खेळी त्यांना केली असावी अशी  चर्चा जनमानसात जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here