दिंडोरा धरणावर प्रकल्पग्रस्त नारी शक्तीचा एल्गार.

0
355

 दिंदोडा धरणावर नारी शक्तीचा एल्गार.

वणी विधानसभा क्षेत्रातील शेवटचे टोक सावंगी येथील नदीपात्रात यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त नारी शक्तीचा एल्गार.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

दिंडोडा प्रकल्पग्रस्तावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात प्रकल्प ग्रस्त्त महिलांचा 12 मार्चला दिंदोडा धरणावर मोर्चा काढून यापेक्षा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे निवेदन मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांचे कडे देण्यात आले.दिंदोडा प्रकल्प ग्रस्तावर झालेल्या अन्याया विरोधात हा महिलां मोर्चा तालुक्यातील सावंगी (संगम) येथे काढण्यात आला होता.प्रकल्प ग्रस्ताना वाढीव मोबदला मिळावा या मागणी साठी हे आंदोलन होते.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महिला शक्तीनी पुढाकार घेत हे आंदोलन केले. दिवसभर रखरखत्या उन्हात वणा व वर्धा नदीच्या संगमावर उभारण्यात येत असलेल्या दिंदोडा  प्रकल्पाच्या अनुषंगाने यवतमाळ वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील 35 गावातील शेतकऱ्यांच्या शेती या प्रकल्पामुळे बाधित होत असल्याने, या सर्व परिसरातील शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे. त्यामुळे नदीपात्रात या नारीशक्तीने शेतीच्या रकमेच्या स्वरूपात वाढीव मदत मिळावी म्हणून आंदोलन उभे केले होते. सरकारने शेतकऱ्यांचा संयमान संयमाचा बांधण्यात करिता लवकरात लवकर मागण्या मान्य केल्यास यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी विलास भोंगाडे यांची उपस्थिती होती.या आंदोलनात प्रकल्प बाधित शेतकरी,शेतमजूर,मच्छिमार बांधवाचे सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा यशस्वीतेसाठी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या महिलां सदस्यांनी प्रयत्न केले. अध्यक्ष पुंडलिक तिजारे, उपाध्यक्ष अभिजित मांडेकर, सचिव चंपत साळवे यांनी वाढीव मोबदला दिल्या शिवाय प्रकल्पाचे बांधकाम करुं नये असा इशारा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. महिलां मोर्चाचे नेतृत्व सुजाता भोंगाडे, समीक्षा गणवीर यांनी केले यशस्वीतेसाठी मंजुषा लडके, जयश्री पिसे, सविता खाडे, मायाताई भोयर, ज्योती भोयर, कल्पना काळे, विद्या तिजारे, शालू डहाके, सोनाली वरवाडे,शालू देवाडे यांनी केले, सूत्रसंचालन ,मंगला ठाकरे यांनी केले.यावेळी तहसीलदार उत्तम निलावाड,तसेच अभियंता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

नारीशक्तीचे इथे घडले दर्शन.

प्रकल्पग्रस्त 35 गावातील नारी शक्ती पोटाची शिदोरी बांधून एकत्र येऊन दिवसभर नदीपात्रात रखरखत्या उन्हात माईक हातात घेऊन पोट तिडकीने आपल्या भावना व्यक्त करत होत्या, सरकारकडे आपल्या भविष्याची चिंता व्यक्त करत होता, आपले संसाराचे भविष्य कसे अंधकारमय होत आहे, त्यामुळे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही हे सांगत होत्या. हे सर्व लोकवाणी जागर प्रत्यक्ष पाहत असताना ती शक्ती एक मातब्बर आंदोलक वाटत होती. सरकारने लवकर न्याय देवून प्रश्न मार्गी न लावल्यास याठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सरकारला समोर जावे लागेल हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here