राजुर येथे भव्य शंकरपट, लाखोंची बक्षिसे.

0
1228

राजूर येथे रंगणार भव्य शंकरपट… बैलगाडा शर्यत, शेतकऱ्यांसाठी आनंदाचा सोहळा.

लाखोंच्या बक्षिसाची मेजवानी, राजू उंबरकर यांच्या हस्ते उद्घाटन .

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जगार

राजूर इजारा समस्त ग्रामवासियांच्या वतीने श्री. विदेही सद्गुरू आणि श्री. जगन्नाथ महाराज शंकरपट बैलांचा जंगी इनामी शंकरपट वणी तालुक्यातील चंद्रभान राजूरकर राजूर ई. यांच्या शेतात आयोजित करण्यात आला आहे. दि. १६ मार्च ते १८ मार्च असे तीन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून, या शंकरपटात अनेक बैलजोड्या सहभागी होणार असल्याचे आयोजक समिती कडून सांगण्यात आलें आहे.

शंकरपट नियमांच्या अधीन राहून भरविण्यात येणार असल्याचे पट समितीने सांगितले आहे. बैलांचा शंकर पट मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर अध्यक्ष म्हणुन मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, शंकर बोरगमवार, वामन बलकी, शिवराज पेचे, निरे सर यांच्या सह गावातील मान्यवर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार.

राजूर इजारा ग्रामस्थ वासियांच्या वतीने आयोजित श्री. विदेही सद्गुरू, श्री. जगन्नाथ महाराज शंकरपटात सहभागी होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून बैलजोड्या वणी तालुक्यातील राजूर येथे दाखल होत आहे. या‎ ठिकाणी परिसरासह राज्यातील‎ पट प्रेमींना शंकर पटाची मेजवाणी‎ मिळणार असून विविध‎ ठिकाणावरून आलेल्या सर्जा-‎ राजाच्या जोड्या आपली कसब‎ दाखविण्यासाठी सज्ज झालेले‎ आहे.‎ तर विजेत्या बैलजोड्या स्पर्धकांना लाखोंच्या बक्षिसाची मेजवानी मिळणार आहे. तरी या बैलगाडा शर्यतीत जास्तीत जास्त बैलगाडा मालक, चालक व बैलगाडा प्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष सोमेंश्वर ढवस, अशोक मिलमिले, अनिल मरापे, सतीश वांढरे, दिनेश बलकी, सचिन तेडेवार, युवराज कुळसंगे यांच्या सह सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात येतं आहे..

विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. बाराही महिने शेतकरी कष्ट करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आनंद सोहळा आयोजित करण्याच्या उद्देशानं आम्ही वणी येथे शंकरपटाचं आयोजन केलं आहे. हा शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाचा सोहळा भरवणे यातच आमचे समाधान आहे. असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here