चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष शिगेला.

0
1353

चंद्रपूर लोकसभा काँग्रेसमध्ये उमेदवारी वरून संघर्ष शिगेला…

शिवानी वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यांच्या लढाईत तिसरा उमेदवार कांग्रेस देणार ?

तेली समाजाची उमेदवारीची आग्रही मागणी…

संभावित उमेदवार, कांग्रेस चा गड राखण्यास कोण आहे सक्षम?

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

चंद्रपूर लोकसंभा निवडणूकीच्या अनुषंगाने कांग्रेसच्या अंतर्गत लढाईत शेवटी उमेदवार कोण असेल? यावर संभ्रम कायम असून उमेदवारीवरून प्रचंड संघर्ष निर्माण झाला आहे. प्रतिभा धानोरकर, वडेट्टीवार, धोटे दिल्लीत तळ ठोकून आहे.

लोकसभेसाठी प्रबळ उमेदवार म्हणून पुढे आलेल्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या स्थानिक नेतावर आरोप करीत “माझ्या पतीचा त्यांनी जीव घेतला व माझा सुद्धा ते जीव घेऊ शकतात पण मी तो जीव जाऊ देणार नाही.” तो नेता म्हणजे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आहे, असा त्यांचा आरोप होता, महत्वाची बाब म्हणजे शिवानी वडेट्टीवार ह्या विजय वडेट्टीवार च्या कन्या लोकसभेसाठी इच्छुक आहे, त्यामुळे धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा कांग्रेस अंतर्गत लढा सुरु आहे असे दिसत आहे, पण आश्चर्यांची बाब अशी आहे की आमदार प्रतिभा धानोरकर यांना ऐन लोकसभा निवडणूकीच्या वेळीच हा मुद्दा काढण्याची का गरज होती? आणि यामुळे त्या काय साध्य करणार आहे हे कळायला मार्ग नसून कांग्रेस ला इथे जिंकण्याची नामी संधी असतांना स्वतःच्या लोकांसोबतच जर ताशेरे ओढण्यात आले व त्यामुळे हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. व त्यात कांग्रेस चा उमेदवार पक्षांतर्गत कुरघोडीमुळे पडेल असे संकेत आहे, त्यामुळे कांग्रेस च्या वरिष्ठ पातळीवरून तिसऱ्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल अशी चर्चा सुरु आहे.

तेली समाजाची आग्रही मागणी.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात तेली समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदार असणे व यापूर्वी माजी खासदार शांताराम  पोटदुखे यांच्या रूपाने या मतदारसंघात सत्ता गाजवलेली आहे.त्यामुळे तेली समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी समोर आली आहे. विशेष म्हणजे, तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विनायक बांगडे व प्रकाश देवतळे या दोघांनी लोकसभेची उमेदवारी मागीतली होती. ही दोन्ही नावे मुंबईतच कापण्यात आल्याने रोष व्यक्त होत आहे, अश्यातच पुन्हा पक्षात निर्माण झालेल्या संघर्षातून माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी उमेदवारीवर दावा केला असून त्यांना सुद्धा तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

 

चंद्रपूर लोकसंभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजप कडून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना उमेदवारी देऊन भाजप ने आपला प्रचार सुद्धा सुरु केला आहे हे विशेष, कालच संपूर्ण मतदारसंघात अनेक ठिकाणी मंदिरात प्रार्थना करण्यात आली.

चंद्रपूर लोकसभा कोण गाजवणार? या संदर्भाने मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रश्न चर्चिला जात आहे. स्वर्गीय धानोरकरांचा कार्यकाल, यांच्या कार्यकाळात झालेली कामे हा प्रश्न मतदारांमध्ये चर्चीला जातं असला तरी बलाढ्य असणाऱ्या मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासमोर आव्हान उभे करणारा कांग्रेस पक्षाचा  सक्षम उमेदवार कोण? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे, मागील वेळी विजय मिळवला तसा विजय कांग्रेस ला यावेळी मिळेल का? याबाबत शंका आहे कारण पक्षात गट तट व अंतर्गत मतभेद यामुळे कांग्रेसची मते विभाजन होण्याची दाट शक्यता आहे, दरम्यान शिवानी वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या परस्पर लढाईत कांग्रेस तिसऱ्या उमेदवाराचा विचार करत आहे, तो तिसरा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, त्यामध्ये कांग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, पूर्व जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, इत्यादी नावाचा विचार कांग्रेस हायकमांड  करण्याची शक्यता आहे, मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्याच नियोजनात मागील लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांना विजय मिळाला होता, आणि आता त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता हे राज्याच पद असल्याने त्यांना या ठिकाणी उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मिळू शकते. कांग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या अंतर्गत गोटात जरी शांतता असली तरी त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून या लोकसंभा क्षेत्रात कांग्रेसला विजय मिळवून देण्याची रणनीती हवी होती, परंतु स्वतःचे मुलीसाठी उमेदवारी मागून दंड थोपटल्याने समोर काय होतं याकडे सर्व मतदार संघातील मतदारांच्या नजरा लागलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here