साधनाताई गोहोकार अध्यक्ष, उपाध्यक्षपदी वंदना आवारी तर सचिव पदी अर्चना बोधाडकर.
राजू तुरणकर- संपादक लोकवाणी जागर.
धानोजे कुणबी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षपदी साधनाताई गोहकर उपाध्यक्षपदी वंदना आवारी तर सचिव पदी अर्चना बोधाडकर यांची अविरोध निवड करण्यात आली.
धनोजे कुणबी महिला विकास संस्थेचे रोपटे 2009 मध्ये लावण्यात आले होते बघता बघता या संस्थेला 14 वर्षे पूर्ण झाली, या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर झाल.
वणी शहरातील धनोजे कुणबी महिला समाजाच्या वतीने 14 वर्षा आधी शारदा-उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील महिलांना एकत्रित करून त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव मीळावा या उद्देशातून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. या संस्थे मार्फत दर वर्षी वेगवेगळे सामाजिक- सांस्कृतिक -बौद्धिक कार्यक्रम महिलां साठी राबवील्या जातात.या संस्थेमध्ये दर तीन वर्षांनी अध्यक्ष बदलल्या जातो तसेच शारदा उत्सव समिती मध्ये सुद्धा दर एक वर्षाला अध्यक्ष बदलल्या जातो, त्यामुळे समाजातील प्रत्येक महिलेला समोर येण्याची संधी मीळते आणी यामुळे समाजातील प्रत्येक महिला आनंदी आणि उत्साहित बघायला मीळते.
आज या संस्थेच्या अध्यक्ष पदाचा पदभार किरणताई देरकर यांनी साधना ताई गोहोकर यांच्या कडे सोपविला त्यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्षा किरणताई देरकर मिनाक्षी देरकर, लताताई वासेकर , कविता चटकी, सविता गौरकार, शारदा ठाकरे ,वनीता काकडे, संगिता खाडे, स्मिता नांदेकर उपस्थित होत्या.