मंगेश डोंगे यांची आत्महत्या नसून विष पाजून मारल्याचा पत्नी प्रणाली मंगेश डोंगे यांचा आरोप.
संशयित आरोपीवर कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा.
लोकवाणी जागर वृत्त…
भालार रोडवरील एम आय डी सी जवळील हनुमान मंदिर जवळ मंगेश डांगे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता, मृतकाची पत्नी प्रणाली हिने उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांना निवेदन देवून संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
प्रणाली मंगेश डोंगे यांनी निवेदनात माझ्या नवऱ्याला बेदम मारहान करून त्यांना विष पाजुन जिवाने संपविल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
19/03/2024 ला मंगेश डोंगे याला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान बैलगाडीच्या शुल्लक कारणावरून बेदम मारहान केली गेली व त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली गेली होती असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनात नमूद सर्व लोकांनी मंगेशला अमानुष मारहान केली व परत गावात दिसल्यास जिवंत मारून टाकतो अशी धमकी दिली. ज्या दिवशी मंगेशला गैरअर्जदारांनी मारहान केली त्या दिवशी त्यांच्या घरी पाहुणे आले होते, त्यांच्या समोर त्याला अमानुषरित्या मारहान केली व जिवानीशी मारुन टाकण्याची धमकी दिली. ही बाब मंगेशच्या जिव्हारी लागली,त्यामुळे घाबरून जाऊन मंगेशने घटनेच्या दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता नांदेपेरा येथुन वणीला जातो व मित्राकडे आदल्या दिवशी झोपतो असे सांगितले व तो घरून निघून गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे .
संशयित आरोपीनी वणीला जाऊन त्यांना जबरदस्तीने विष पाजले असावे व त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत देह संशयास्पद स्थितीत एम.आय.डी.सी. वणी परिसरातील हनुमान मंदिरच्या समोर आढळून आला. घटनेच्या आदल्या दिवशी वरील सर्व संशयित आरोपीने माझ्या पतीला केलेली अमानुष मारहान व जिवे मारण्याची दिलेली धमकी हया मुळे माझ्या पतीला वरील आरोपींनीच विष पाजले असावे व आत्महत्येस प्रवृत्त् केल्याच्या कारणावरुन वरील सर्व संशयित आरोपींवर खुनाचा व आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांच्या मार्फत निवेदन देवून केली आहे.
सदर प्रकरणात सात दिवसाचे आत चौकशी करून वरील आरोपिंवर गुन्हा दाखल करण्यांत यावा अन्यथा दिनांक 02/04/2024 पासुन आपल्या कार्यालया बाहेर न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.