विदर्भातील चंद्रपुरात होणार रंगतदार लढत, धानोरकर व मुनगंटीवार यांच्यात काट्याची टक्कर….
चंद्रपूर लोकसभेसाठी 36 उमेदवार रिंगणात… कोण मारणार बाजी…
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघा करिता नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. 27) 29 उमेदवारांनी 37 नामनिर्देशनपत्र दाखल केली. त्यामुळे अर्ज भरणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामांकन पत्रांची एकूण संख्या 48 आहे.
मंगळवारी सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केला तर इतर 10 असे एकूण 11 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, तर नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसी बुधवारी नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या आ.प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा जोरदार शक्तिप्रदर्शन करीत 3 अर्ज दाखल केले. वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांनी 3, विद्यासागर कासर्लावार यांनी 1, भीमसेना पक्ष 1 अर्ज अपक्ष म्हणून, नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांनी 2 अर्ज, जावेद अब्दुल कुरेशी यांनी १ अर्ज, अपनी प्रजा हित पार्टी 1, रमेश मडावी यांनी 1, बहुजन समाज पार्टीनी 1 नामांकन अर्ज दाखल केला आहे. याशिवाय पूर्णिमा घनमोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दिवाकर गुलाब पेंदाम (विरों के वीर इंडियन पार्टी), मोरेश्वर बडोले (अपक्ष), मिलिंद दहिवले (अपक्ष), सेवकदास बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक), अमोल कोमावार (हिंदू राष्ट्र संघ), राजेंद्र रामटेके (बहुजन समाज पक्ष), राजेंद्र हजारे (अपक्ष), दिनेश मिश्रा (अपक्ष), वनिता राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), जावेद मजिद अब्दुल (अपक्ष), विकास लसंते (सन्मान राजकीय पक्ष), संदीप वाघमारे (अपक्ष), प्रमोद देठे (अपक्ष), संजय गावंडे (अपक्ष), संजय टेकाम (अपक्ष), राजेश घुटके (अपक्ष), शेख वजीर (अपक्ष), सूर्या अडबाले (अपक्ष), अनिल डहाके (अपक्ष), दिवाकर उराडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), दिलीप माकोडे (अपक्ष), गीता मेहर (अखिल भारतीय परिवार पार्टी) यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला.
भाजपा कडून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तर दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस पक्षाकडून चंद्रपूर, वणी , आर्णी लोकसभेच्या रिंगणात उमेदवारी दिल्याने खरी लढत भाजपा व काँग्रेस मध्ये असल्याची जोरदार चर्चा जनमानसात सुरू आहे.
भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना ही निवडणूक जिंकणे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रतिष्ठेची आहे. तर महाराष्ट्र राज्यात एकमेव खासदार म्हणून 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले स्वर्गीय बाळू भाऊ धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा ही जागा जिंकून काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा कायम ठेवणे प्रतिष्ठेचे समजले जात आहे.
सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कार्यपद्धती तसेच दमदार नेतृत्वाची चर्चा जन माणसात दिसून येत असून प्रतिभा धानोरकर यांच्या विषयी जनमानसात सहानुभूतीची लाट हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
एकंदरीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने काट्याची टक्कर निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जनमानसात प्रचंड उत्सुकता असून , एकमेकांना कोण जिंकेल असे प्रश्न उपस्थित करून कुणाच्या मनात काय आहे याचा अंदाज घेणे सुरू आहे. मात्र ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही उमेदवाराला पराकोटीचे प्रयत्न करावे लागणार हे निश्चित.