वणीत पार पडला, अद्भुत ,अद्वितीय डोळ्यांची पारणे फेडणारा शिवजन्मोत्सव सोहळा.
मनसे सातत्याने जोपासतय वणी शहराचे सांस्कृतिक वैभव.
शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासत युवा पिढीने महाराजांचे विचार आत्मसात करावे व विचारांचा प्रसार व्हावा म्हणून भव्य आयोजन – राजु उंबरकर
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
ताशांचा गजर, नृत्य, झांजांचा निनाद, आकर्षक देखावा आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत आणि आचारसंहितेच्या नियमांचे पालन करून वणी येथील शिवतीर्थावर अद्भुत अद्वितीय डोळ्यांचे पारणे फेडणारा तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे राजू उंबरकर यांच्या माध्यमातून वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये तुळजा भवानी मातेचा भव्य दिव्य देखावा, शिवरायांचा महाअभिषेक, ढोल ताशा पथकाचे वादन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या जयंती सोहळ्यानिमित्त वणी परिसर भगवामय होऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‘ या जयघोषात दणाणून गेला. शिवजयंतीनिमित्त चौकाचौकात भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
वणीत पारंपरिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ महाअभिषेक करून करण्यात आला. त्यानंतर याठिकाणी अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी मात्र ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसरात अतिशय उत्साहाचे वातावरण झाले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेले बाल शिवाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्याचबरोबर ढोल ताशांचा गजर, नृत्य, शिवरायांचा गगनभेदी जयघोष यामुळे शिवजयंती सोहळ्यात अधिकच भर पडला.
मनसेच्या वतीने प्रत्येक थोर पुरुषांच्या जयंत्या, सांस्कृतिक महोत्सव, सण व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करून वणी शहराचे सांस्कृतिक वैभव जोपासण्याचे काम सातत्याने होत आहे. छत्रपती शिवरायांची जयंती पूर्वी वर्षानुवर्ष तिथीप्रमाणे साजरी व्हायची, तोच वारसा जोपासत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये तुळजा भवानी मातेचा आकर्षक आणि भव्य दिव्य जिवंत स्वरूप असलेला नयनरम्य देखावा उभारण्यात आला होता. शिवजयंती साजरी करण्याबरोबरच तरुण पिढीने शिवरायांच्या संघर्षमय विचारांचा वारसा जोपासत जीवनात आत्मसात करावे व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणे सर्वांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिवरायांनी दिलेल्या विचारांवर वाटचाल करत आहोत आणि यापुढेही करत राहू.