त्या खानी ठरत आहे जीवघेण्या.
कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा मृत्यू.
राजू तुरणकर – संपादक.
वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन परिसरात येत असलेल्या मोहदा या गावी एक अल्पवयीन मुलगी कुमारी विद्या अनील आडे ही घरची कपडे धुण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्याच्या खड्यात पडून मृत्युमुखी पडल्याची हृदयदावक घटना घडली आहे.
मोहदा गावालगत असलेल्या गीट्टी खदानीत विद्या अनिल आडे वय 15 वर्षे ही आज दिनांक 4 एप्रिल ला दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेली असता कपडे धुत असतांना अचानक अंदाज चुकल्याने पाण्यामध्ये तीचा पाय घसरला आणी ती खोल पाण्यात बुडु लागली. सोबत असलेली मुलीच्या लक्ष्यात येताच ती लगेच आरडाओरडा करू लागल्याने आजु बाजुचे लोक खदानी कडे धावत आले व मुलीचे वडील सुद्धा आले.
काहींनी पाण्यात उड्या मारल्या परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले होते. तो पर्यंत विद्या चा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता.
गावकऱ्यांनी पो स्टे शिरपुर ला माहीती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले मुलिचा (विद्या चा) मॄतदेह बाहेर काढून पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे सायंकाळी 5 वाजता दाखल केला असता सदर मॄतदेहाचे शवविच्छेदन होवून मॄतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
खानी मोहदा वासियांसाठी जीवघेण्या ठरत आहे.
प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. प्रदूषित हवा , दूषित बारुत युक्त पाणी पुरवठा याचा आणि जनमानसावर विपरीत परिणाम होत आहे. मोहदा गावामध्ये अनेक लोकांना कॅन्सर सारख्या रोगाने ग्रासले आहे. एकंदरीत खानी मुळे जनजीवन प्रभावित झाले आहे.