खळबळ जनक घटना वणीत सशस्त्र दरोडा, पोलीस प्रशासनाला खुले आव्हान.
दिनानाथ नगर मध्ये धाडसी दरोडा, 8,89000/- रुपयाचे वर सोन्याचे दागिने घेवून लुटारू फरार.
राजू तुरणकर – संपादक.
वणी शहराला लागून असलेल्या पटवारी कॉलनी ( लालगुडा) येथे शुक्रवार चे मध्यरात्री एका घरात धारदार शत्राचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला. यात आठ लाख एकोन नव्वद हजार (८८९००००) चे वर सोन्याची दागिने व मुद्देमाल लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आली.
वणी शहरातील लालगुडा परिसरात सुभाष वासुदेव पिदुरकर आपले कुटुंबासह वास्तव्यात आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल च्या मध्यरात्री 2 : 30 दरम्यान पाच अज्ञात दरोडेखोरांनी धारधार शस्त्रांसह घरात प्रवेश करून घरात गाड झोपेत असलेल्या पत्नी व मुलीच्या अंगावरील सोन्याचे दागिने सह कपाटातील सोन्याची दागिने घेवून चोरटे रिपोर्ट दिल्यास मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले.
मुलीला जिवे मारण्याची धमकी.
” इकबाल लगा गर्दन पे तलवार, अगर तुमने पोलीस स्टेशन मी रिपोर्ट दिये , तुम्हारी लडकी को जान से मार डालेंगे, वो कहा से जाती, कहा से आती , हमको सब मालूम है, अशी धमकी देत मानेवर धारधार सूऱ्या ठेवून शस्त्राच्या धाकावर लूट. हा एखाद्या सिनेमासृष्टीतील शोभेल असा थरार पिदुरकर कुटुंबीयांनी अनुभवला. आम्ही जिवंत वाचलोच हेच आमच्यासाठी सौभाग्य असे समजून ढसाढसा रडणारे कुटुंब संपूर्णतः दहशतीत आले आहे. पिदुरकर कुटुंबीयांच्या सुरक्षेची हमी घेणे व लुटारूंना शोधून काढणे पोलिसांसाठी फार मोठे आव्हान आहे.