चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत वणी तालुक्यातील मतदारांची भूमिका निर्णायक.
नेते कार्यकर्ते जोरात तर मतदार संभ्रमात. वरपांगी व एकतर्फी प्रचाराने जनता हैराण…
राजू तुरणकर – संपादक.
वणी : लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असुन प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता जोमाने कामाला लागलेले दिसत आहे. त्यामुळे चौकाचौकात, शेतशिवारात केवळ राजकारणाच्याच चर्चा मोठ्या रंगत आहेत. परंतु निवडणुका म्हटलं की अमाप बजेट. आणि बजेट असल्याशिवाय विजय मिळवण अवघड आहे. “माल लगाव माल पाव” असा प्रकार सुरु झाल्यामुळे लोकशाही मध्ये सामाजिक कार्यकर्त्याना निवडणुकी मध्ये विजयाची संधी मिळत नाही. त्यामुळे निवडणुका कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याने यंदा मतदार कोणती भूमिका घेईल हे महत्वाचे आहे.
पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात आहे. आणि कालपासून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. परंतु पाहिजे तसा प्रभाव प्रचारातून दिसून येत नाहीये. फक्त सोशलच्या मीडियाच्या माध्यमातून विजय आपलाच असं भासवलं जात आहे. ते केवळ स्वतःला समाधान मानून घेण्यासाठी ते मृगजळ आहे तर काटे कीं टक्कर वैगेरे वैगेरे… वातावरण जरी असलं, तरी मात्र प्रत्यक्षात लढत रंगतदार आहे…आपले घेवून चला, आपल्याच लोकांना महत्त्व द्या, ही एकतर्फी व विषारी प्रचार यंत्रणेचा निकालावर घातक परिणाम पडू शकतो अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
सध्या चर्चेत असलेल्या एकाही उमेदवाराकडे जनतेचे प्रश्नच नाही, उलट जनतेचे प्रश्न बाजूला सारून आपला विजय आणि पक्षाच्या सिटा कशा निवडून येईल, इतकाच कल दिसत आहे. तूर्तास हुकूमशाही व चारशे पार एवढंच. शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न हद्दपार झाल्याने बेरोजगारी,महागाई ह्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने प्रचारात दम नाही अशी चर्चा रंगू लागल्या आहे. मात्र,राजकीय जाणकाराकडून ही निवडणूक फार अत्यंत महत्वाचे आहे असं म्हटलं जातं. आणि चंद्रपूर वणी आर्णी तर फार अटी तटीची निवडणूक होणार आहे. असे देखील चर्चील्या जात आहे. त्यामुळे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून कोण बाजी मारतो अशी रंगतदार चर्चा मतदार संघातील गल्लोगल्ली सुरु आहे.
विशेष म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण या धोरणाचा फटका नागरिकांना बसला आहे. अशी ओरड मतदारात असून याबाबत देशभरात आवाज उठवला गेला होता. परंतु राज्यकर्त्यांना साधा पाझरही फुटला नसल्याचे जनतेत तीव्र संताप यानिमित्ताने उमटत आहे. निवडून आलेला लोक प्रतिनिधी देश हितापेक्षा स्वहीत साधण्यात धन्यता मानत असून ईडीच्या धाकाने आपली निष्ठा धुळीत मिसळत असल्याचे उदाहरण ताजे आहेत. सामान्यांचा वाली कोणी नाही. त्यामुळे हा बनवाबनवीचा खेळ मतदार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
पाटील, राठोड, अहिर, धानोरकर आता कोण…
वणी विधानसभा सर्व क्षेत्रात मागासलेले….. दमदार नेतृत्वाची गरज.
आतापर्यंतच्या सर्व खासदारांनी केले दुर्लक्ष…
यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्र हे औद्योगिक,सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे यामागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे या निवडणुकीत विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच मतदार मतदान करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणुका आल्या की “आम्ही मेंढर मेंढर पाच वर्षांनी होतो रे आमचा लीलाव” ही उपाधी येथील मतदारांना तंतोतंत लागू होते.कधी पक्षाच्या, कधी नेत्याच्या तर कधी जातीच्या नावावर मंतांची झोळी घेवून निवडून येणारे नेते पाच वर्षे स्वतःचे अस्तित्व शोधण्यात खर्च करीत असतात.
लोकसभेची निवडणूक देशाच्या अखंडतेची, एकात्मतेची, सुरक्षेची आणि विकासाची निवडणूक असल्यामुळे मतदार विचारपूर्वक निर्णय घेवून मतदान करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.