वणी विधान सभा मतदार संघात संजय खाडे यांचा लोकसभेच्या प्रचाराचा धडाका.
प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा, गृह भेट.
राजू तुरणकर – संपादक.
वणी: वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा प्रचाराचा झंझावात सुरु आहे. काँग्रेसचे नेते, इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराला जोमाने लागले आहेत. कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे संजय खाडे व सहकारी हे पायाला भिंगरी लावून प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ वणी विधानसभा क्षेत्रात फिरत आहे. कॉर्नर सभा, गृहभेटीचा त्यांनी धडाका लावला आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावोगावी जाऊन मतदारांचे प्रत्यक्ष भेटी घेणे कारण सभा घेऊन मार्गदर्शन करणे आणि प्रतिभाताई निवड झाल्यास या वनी विधानसभा क्षेत्राचा विकास कसा करून घेता येईल हे पटवून देण्याचे काम संजय भाऊ खाडे सातत्याने करून प्रतिभाताई धानोरकर यांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल जनतेला पटवून देत आहे. त्यांच्या बैठक व सभेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत.
काँग्रेसच्या विविध टीम वणी विधानसभा क्षेत्राच्या विविध भागात सध्या प्रचार करीत आहे. यातील संजय खाडे आणि सहकारी यांची एक टीम आहे. ही टीम सध्या प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ गावखेडे पिंजून काढीत आहे. सकाळपासून सुरु झालेला हा प्रचार रात्री उशिरा पर्यंत सुरु असतो. कधी कधी शेवटच्या गावाहून परतण्यास मध्यरात्र देखील होते. मात्र पुन्हा सकाळी त्याच उत्साह व जोशात पुन्हा प्रचार सुरु होतो.
रोज एक भाग निवडून त्या भागात रात्री उशिरा पर्यंत प्रचार सुरु असतो. आतापर्यंत जवळपास 40 ते 50 गावांचा दौरा करण्यात आला आहे. प्रचारासाठी प्रा. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, उत्तम गेडाम, अनिल भोयर, जितेंद्र बोंडे यांच्यासह गावातील काँग्रेस, इंडिया आघाडीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या टीमसह इतर टीमचाही जोमात प्रचार सुरु आहे.
भाजपविरोधात मतदारांचा संताप – संजय खाडे
महागाई, बेरोजगारी आणि संविधानाची रोज होणारी पायमल्ली याने सर्वसामान्य मतदारांमध्ये भाजपविरोधात संताप असल्याचे प्रचारा दरम्यान दिसून येत आहे. यावेळी मतदारांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांचा भाजपविरोधात संताप असून यावेळी सर्वसामान्य मतदार भाजपला धडा शिकवणार असल्याचे प्रतिपादन संजय खाडे यांनी केले.