राहुल झट्टे यांचा अपघात, गंभीर दुखापत.
लालपुलिया परिसरात मागून वाहनाने दिली धडक
राजू तुरणकर – संपादक.
वणी : सातत्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असुन, त्यातच राजुर कॉलनी ते लाल पुलिया परिसरात अपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या परिसरात अपघात नित्यनेमाचे झाले आहे.
वणी परिसरात कृषी सल्लागार म्हणून प्रसिद्ध असलेले राहुल झट्टे यांना अज्ञात वाहनाची मागून धडक बसली असता ते गंभीर जखमी झाले त्यांना वणी येथे प्राथमिक उपचार करून त्यांना यवतमाळ येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, मनगटला चार ठिकाणी क्रॅक आले असून ऑपरेशन करण्यात आले आहे. गुढीपाडव्यासाठी आपल्या मूळ गावी चिंचाळा येथे गेले असता तिथून वणी येथे परत येत असताना मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने राहुलला गंभीर इजा झाली, दैव बलवत्तर होते म्हणून राहुलचे प्राण वाचले. अन्यथा लालपुलियावर अपघात म्हंटले की जीव वाचण्याची शक्यता कमी असते.