वणी विधानसभा क्षेत्रात पार पडले शांततेत मतदान.
मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांची निराशा..
राजू तुरणकर – संपादक.
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज सकाळी सात वाजता सुरू झाले मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक दोन घटना वगळता शांततेत पार पडले.
ग्रामीण भागात मतदानामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला तर शहरी भागात मतदान केंद्रावर सकाळी गर्दी व शांततेत तर संध्याकाळी मतदान केंद्रावर निरुत्साह दिसून आला.
चंद्रपूर, वणी , आर्णी लोकसभा क्षेत्रात पाच वाजेपर्यंत मतदानाच्या 55.11 % मतदान झाले होते.
तर एकूण मतदान 63.07% झाले आहे. मतदानाची कमी झालेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडेल हे सांगता येणं शक्य नाही. तरी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर व भाजपचे उमेवार सुधीर मुनगंटीवार यांच्या त सरळ लढत, दिसून येत आहे. 2019 ला या मतदारसंघात 64.66 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहर तसेच मारेगाव तालुका स्थळी अनेक मतदारांची मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान केंद्रावर मतदान न करता परत जाण्याची वेळ आली होती. यावेळी काही राजकीय कार्यकर्त्यांनी मारेगाव या ठिकाणी तहसीलदारांची वाद सुद्धा घातला होता.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता पासूनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती.