आजाराने त्रस्त इसमाची विहिरीत उडी घेत आत्महत्या.
मारेगावातील ह्रदयदावक घटना….
आनंद नक्षणे – मारेगाव.
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 1 मधील इसमाने काल रात्री विहिरीत उडी घेत, जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेत आत्मघात केल्याची हृदयदावक घटना घडली आहे.
विजय नामदेव काळे (55) विहिरीत उडी घेवून आत्मघाती निर्णय घेतलेल्या इसमाचे नाव आहे. ते मागील काही दिवसापासून आजाराने त्रस्त होते. आजारामुळे होणाऱ्या व्याधी व महागडे औषधोपचार यामुळे त्यांनी त्रस्त होऊन मारेगाव शहराला लागून असलेल्या ठाकूर यांचे शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
रात्री आठ वाजताचे दरम्यान घडलेली दुर्देवी घटना घडली आहे .मारेगाव रुग्णालयात उच्चस्तरीय तपासणीसाठी मृतदेह आणण्यात आला.मृतक विजय काळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा आहे.