जाहिरात प्रसिद्धीसाठी पत्रकाराच्या नावाने आलेला मलिंदा हडप करणारे तीन राजकीय पुढारी …
एका वृत्तपत्राचा खळबळजनक दावा…
बदनामी कारक वृत्त, लोकसभेचा उमेदवार दखल घेवून वृत्ताचे खंडन करेल काय ?
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
चंद्रपूर लोकसभेच्या अनुषंगाने एका पक्षाच्या उमेदवाराच्या वतीने मारेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना प्रसिद्धी व जाहिरात साठी आलेला निधी त्याच पक्षाच्या जबाबदार राजकीय पुढाऱ्यांना सोपवून संबंधित सर्व पत्रकारांना तो निधी सोपस्कार वाटप करण्याचे काम सोपविण्यात आले होते, मात्र तो निधी पत्रकारापर्यंत न पोचवता परस्पर हडप केल्याचा खळबळजनक दावा एका साप्ताहिक वृत्तपत्रात ग्राउंड लेव्हल वर काम करणाऱ्या राजकीय पदाधिकारी यांचे नावासहित वृत्त प्रकाशित केल्याने संपूर्ण मारेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा निवडणुकीत पहिल्या चरणामध्ये बीजेपी विरुद्ध काँग्रेस मधेच खरी लढत होती . दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार यंत्रणा त्याचबरोबर सभा रॅली याद्वारे मतदाराच्या घराघरापर्यंत पोहोचत प्रचार केला. या सर्व बाबींची वृत्तपत्राच्या माध्यमातून बातम्या देऊन प्रसिध्दी देण्याचे काम पत्रकार सातत्याने निस्वार्थ पने करीत असतात, त्यांना मानधन म्हणून उमेदवार एक सन्मान निधी देत असते, परंतु त्यांच्यासाठी आलेला सन्मान निधी, हा त्यांना न देता हडप केल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात छापून आल्याने सर्व पत्रकार बांधवांमध्ये तीव्र नाराजी तर मारेगाव तालुक्यात पैसा आला की नाही, की पक्षाच्या अंतर्गत असलेली खदखद या माध्यमातून छापून एकमेकावर ताशेरे ओढण्याचे काम, की पराभवाची भीती, की चिखलफेक अशी जोरदार चर्चा रंगत आहे.
सदर वृत्ताचे लोकसभेचे संबंधित पक्षाचे उमेदवार दखल घेऊन ग्राउंड लेव्हल वर काम करणाऱ्या प्रतिष्ठित राजकीय पुढार्यांना बोलावून खंडन करतील काय? कारण शक्यतोवर लक्ष्मी वाटपाचा कार्यक्रम हा पहिल्या फळीतील जबाबदार पुढाऱ्यांकडे सोपविला जातो, त्यामुळे पक्ष संघटनात्मक दृष्टीकोनातून या बाबीची गंभीर दखल न घेतल्यास या वृत्ताचे दूरगामी परिणाम पक्षाला भोगावे लागू शकतात अशी चर्चा मारेगावात सुरू आहे.