त्या बदनामीकारक वृताची दखल घेत काँग्रेसने दिले चौकशीचे निवेदन… तिन्ही पदाधिकाऱ्यांना क्लीन चिट..
काँग्रेस आक्रमक, कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा.
आनंद नक्षणे – मारेगाव.
वर्धा येथून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रात दिनांक 22 एप्रिल 2024 रोजीच्या अंकात मारेगाव तालुका काँग्रेस पदाधिकारी यांच्या संदर्भात पैसे हडप केल्याच्या मथळ्याखाली बदनामीकारक वृत्त प्रकाशित केल्याच्या निषेधार्थ मारेगाव काँग्रेस पदाधिकारी यांच्या वतीने निषेध व्यक्त करीत बातमीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तहसीलदार मारेगाव यांना निवेदन देण्यात आले.
वृत्तपत्रातून चंद्रपूर लोकसभा प्रचारादरम्यान मारेगाव येथील काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकर, नगरसेवक नंदू आसुटकर, वसंत जिनिग संचालक अंकुश मापुर यांनी पत्रकाराच्या नावाने आलेला पैसा हडप केल्याचे तथ्यहीन वृत्त प्रकाशित करून काँग्रेस पक्षाची व पुढाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्न केल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बातमी कसल्या आधारावर व कोणत्या पुराव्यावर प्रसिध्द करण्यात आली याचा खुलासा देण्यात यावा, पत्रकारासाठी पैसे या तिघांजवळ आलेले नाही. असाही उल्लेख निवेदनात करून पक्षाच्या वतीने तीनही पुढाऱ्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
सदर बातमीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस कमिटी मारेगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी अरुणाताई खंडाळकर माजी म.बा. कल्याण सभापती यवतमाळ, वसंतरावजी आसुटकर सोसायटी अध्यक्ष मार्डी, शंकरराव मडावी शहर अध्यक्ष कॉ. क. मारेगांव, समिर सय्यद शहर युवक अध्यक्ष,, शकुंतला वैद्य, पल्लाश बोढे, विलास वासाडे सह शेकडो कार्यकर्ते हजर होते.