नवरगाव येथे शेतकऱ्याची बैल गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या.
आनंद नक्षणे- मारेगाव.
तालुक्यातील नवरगाव (धरण ) येथे दुपारी 12 च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या.शेतात असलेल्या बैल गोठ्यात दोरी बांधून उमेश नि गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २९ एप्रिल रोज सोमवार रोजी दुपारी अंदाजे 12 वाजताच्या उघडकीस आली. उमेश अशोक नक्षणे वय वर्ष (३५) असे गळाफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून उमेश च्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी मोठा भाऊ असा आप्ते परिवार पाठीमागे आहे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.