चोरीसाठी चौकिदराची हत्या, दहशत…

0
798

चोरीसाठी चौकीदाराची हत्या….. पळसोनी फाट्याजवळील गोडावूनमध्ये दरोडा..

चोरी आणि हत्या घटनेमुळे परिसरात दहशत….

राजू तुरणकर – संपादक.

सिमेंट व सलाख ठेवलेल्या गोडावूनची रखवाली करणा-या चौकीदाराची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. जीवन झाडे असे रात्र पाळीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या मृतकाचे नाव आहे. या घटनेत दरोडेखोरांनी चोरी करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावलेले cctv कॅमेरा तोड ताड करून गोडावूनसमोर ठेवलेले अनेक बंडल सळाखी चोरून नेल्या आहेत. तर दोन बंडल (प्रती साठ किलो) रोड लगत काटेरी झुडपात टाकून ठेवले आहे.

चोरी करण्यात आडकाठी येत असल्याने चौकीदाराची हत्या करून लोखंडी सळाखीचे बंडल चोरून नेले व बंडल नेण्यासाठी चार चाकी वाहनाचा उपयोग केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे…

मृतक जीवन झाडे (60) रा. आष्टोना ता. मारेगाव येथील रहिवासी होते. ते आपले पत्नीसह या ठिकाणी मागील बारा वर्षापासून चौकीदारीचे काम करीत आहे. काही कामानिमित्ताने पत्नी काल आस्टोना या आपले गावी मुक्कामी गेल्या होत्या.

खिवंसरा यांच्या मालकीचे बिल्डिंग मटेरिअलचे दुकान वणी येथे आहे. दुकानाचे पळसोनी फाटालगत गोडावून आहे. या गोडावूनच्या आत सिमेंट व ईतर वस्तू तर बाहेर सळाखी ठेवलेल्या आहेत. रविवारी दिनांक 28 च्या मध्यरात्री चोरी करण्यासाठी आलेल्या  दरोडेखोरांन सोबत त्यांची झटपट झाली असावी किंवा दरोडे टाकणाऱ्या मध्ये कुणाला तरी ते ओळखत असावे आणि आता त्यांनी आपल्याला ओळखलं, जर यांना जिवंत सोडलं तर आपण पकडल्या जाऊ अशा भीतीने कदाचित त्यांना कायमच संपविल असावे, अशी या परिसरात जोरदार चर्चा होती. ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचा मर्डर करण्यात आला, त्या ठिकाणावरून साहित्य चोरून नेल्याचे ठिकाण हे जवळपास 200 फुटाचा अंतर आहे. सदर घटनेने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

वणी उपविभागीय पोलीस अधिकारी, वणीचे ठाणेदार सह संपूर्ण स्टॉप घटनास्थळी येवून बारकाईने स्थळाची निरीक्षण करून, पंचनामा करण्यात आला. यवतमाळ वरून गुप्त विभागाची टीम आली होती. पोलीस प्रशासन सदर घटनेचा कसून तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here