रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी…..
लोकवाणी जागर…. वणी तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक ७ मे रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.
वणी येथील ट्रॅक्टर हा अहेरी (बोरगाव) घाटावर रेती भरण्यासाठी जात असताना घाटाजवळील वळणावर ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने रवी भारत मेश्राम वय २७ वर्ष रा. नवीन वागदरा असे अपघातात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. तर चालक विशाल तुळशीराम नैताम ३२ वर्ष रा. नवीन वागदरा हा गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले.
ट्रॅक्टर ड्रायव्हर विशाल तुळशीराम नैताम वय 32 वर्ष व रवि भारत मेश्राम वय 27 वर्ष हे खाली ट्रॅक्टर घेऊन रेती भरण्या करिता अहेरी (बोरगाव) येथील कोलवॉशरी पासुन नदी कडे जाणा-या कच्चा रोडवरील वळणावर ट्रॅक्टर क्र. MH29-BP-5601 चे ट्रॉली क्र. MH29-AK-5157 हे पलटी झाल्याने रवि भारत मेश्राम वय 27 वर्ष हा खाली पडला व त्याच्या अंगावर ट्रॉली पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्यास ग्रामीण रुग्णालय वणी येते आणले असता डॉक्टरांनी तपासुन मरण पावल्याचे सांगितले व ट्रॅक्टर ड्रायव्हर याला अपघाता मध्ये गंभीर मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
रवि मेश्राम यांच्या आईने वणी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्या वरून वणी पोलिसांनी टॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून तपासात घेतला. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.