मारेगाव व परिसरातील जनतेसाठी अत्याधुनिक सुविधेसह लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सज्ज.

0
253

मारेगाव व परिसरातील जनतेसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधेसह डॉ लोढा हॉस्पिटल जनसेवेत सज्ज..

11 मे ला शुभारंभ….

मेडिकल पासून अद्यावत सुविधा उपलब्ध.
विविध आजाराचे दहा तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मारेगाव करांच्या सेवेत….

आनंद नक्षणे- मारेगाव

आदिवासी बहुल मारेगाव तालुक्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांना बराच मानसिक,शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब ओळखून डॉक्टर लोढा यांनी मारेगाव परिसरातील जनतेसाठी अत्याधुनिक सुविधांसह तज्ञ डॉक्टरांची टीम मारेगाव शहरात जनतेच्या सेवेत लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या रूपाने सज्ज केली आहे.

रुग्णांना योग्य व माफक दरात सेवा व मार्गदर्शन करण्यासाठी सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध करीत मारेगाव शहरात उद्या दि.11 मे रोजी लोढा हॉस्पिटल व पार्थ मेडिकलचा उदघाटन समारंभ होणार आहे.

जम्बो नियोजित इमारतीत अत्याधुनिक सुविधायुक्त लोढा हॉस्पिटलचे उदघाटन श्री. अमरचंदजी लोढा, श्री. खुशालचंदजी ओस्तवाल, श्री. प्रकाशचंदजी कोचर यांचे हस्ते होणार आहेत.

या खासगी हॉस्पिटलमध्ये जनरल फिजिशन म्हणून डॉ. राजेंद्र लोढा, प्रसूती स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडिया, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.सुबोध अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ डॉ.पवन राणे, नेत्र रोग तज्ज्ञ डॉ.स्वप्नील गोहोकार, दंत रोग तज्ज्ञ डॉ. अमोल पदलमवार, शस्रचिकित्सा तज्ज्ञ डॉ. अक्षय खंडाळकर हे उपचार पद्धती करतील.

गरजू रुग्णांनी अद्यावत सुविधा उपलब्ध असलेल्या लोढा हॉस्पिटल मध्ये लाभ घेण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र लोढा, डॉ. महेंद्र लोढा, दुष्यन्त जयस्वाल, अंकुश माफूर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here