अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा स्थानांतर सोहळा संपन्न

0
321

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न.

विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन…

राजू तुरणकर  – संपादक

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व उद्घाटन सोहळा विजयबाबु चोरडिया सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते संपन्न झाला.

श्री धनलक्ष्मी RN1162 ही पत संस्था मागील अनेक वर्षांपासून जटाशंकर चौकातील किटकुले कॉम्प्लेक्स मध्ये कार्यरत होती. सिमा विजय चोरडिया ह्यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संस्थेला विकासात्मक गती देण्याच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक के.व्ही.सी. हाईटस् रविंद्रनाथ टागोर चौक वणी येथील इमारतीत भव्य शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सिमा विजय चोरडिया अध्यक्षा श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था मर्या वणी, पूजा जगन्नाथ जुनगरी उपाध्यक्ष, संचालक आरती संजय चौधरी, मंजुताई अनिल बिलोरिया, वंदना प्रवीण राजूरकर, पल्लवी प्रशांत उदापूरकर, ताई कवडूजी मुठ्ठावार,संगीता अनिल खंगार, सरोज संतोष कोनप्रतीवार , कविता अरविंद राऊत, गीता राजू तुरणकर, सुषमा राजू येवले, सोनू राजेंद्र मदान, शाखा व्यवस्थापक अतुल मुठ्ठावार समस्त कार्यकारणी सदस्य व कर्मचारी वृंद तसेच शहरातील  प्रतिष्ठित पुढारी जनप्रतिनिधी व व्यापारी उपस्थित होते.

हंसराज अहिर यांची शुभेच्छा भेट.

या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी शुभेच्छा भेट दिली यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी दिनकरराव पावडे सह अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यासोबत यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here