20 में रोजी वणीत विकास राजा यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
सुप्रसिद्ध बॉलीवूड गीतकार,भीम शायर प्रणय सतलज यांची प्रमुख उपस्थिती
यंग इंडिया ऑफ आंबेडकर राईट मूव्हमेंट चे भव्य आयोजन.
राजू तुरणकर – संपादक.
वणी- अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त येथील एस. पी.एम हायस्कूलचे मागील भीम नगर वणी चे भव्य खुल्या पटांगणात सायंकाळी ठीक 5 वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार, भीम क्रांतीचा बुलंद आवाज विकास राजा यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बॉलीवूड गीतकार सुप्रसिद्ध भीम शायर प्रणय सतलज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजक यंग इंडिया ऑफ आंबेडकरराईट मूव्हमेंट यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष न.प.मारेगाव चे पाणी पुरवठा सभापती हेमंत नरांजे आहेत.तर प्रमुख अतिथी फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ गाणार,मेघाताई सुधीर पेटकर, हरिष पाते, सत्कारमूर्ती अंजनाताई सुरेश मोडक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
20 में रोजी वणी येथे होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात परिसरातील तमाम समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यंग इंडिया ऑफ आंबेडकरराईट मूव्हमेंट,वणी यांनी केले आहे.