दुचाकीने महिलांना उडवून, दुचाकी स्वार फरार….
एक महिला गंभीर, धूम स्टाईलने गाडी चालवणाऱ्या युवकांवर कारवाई होणार ?
राजू तूरणकर – लोकवाणी जागर.
प्रगती नगर दुभाजका जवळ रस्ता ओलांडताना पायदळ जात असलेल्या महिलांना दुचाकीस्वाराने उडवून फरार झाल्याची घटना काल रात्री 9.25 वाजे दरम्यान घडली आहे.
बजाज पल्सर कंपनीची दुचाकी MH 34 AN 4325 जिच्यावर समोरून NK व मागून ताज चा सिम्बॉल काढून खाली गरीब असे लिहलेले असलेल्या गाडीने दोन महिलांना व एक छोट्या बालकाला भरधाव ठोस मारून उडवून दिले व गाडी टाकून पळून गेले. गाडीवर तीन युवक असल्याचे सोबत असलेल्या महिलेने सांगितले त्यातील एक महिला ही नऊ महिन्याची गर्भवती आहे. हर्षदा हरीश चटप असे त्या महिलेचे नाव आहे. गर्भवती महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला असून तीच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर सोबत असलेल्या महिलेला व छोट्या बालकाला कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरूप आहे. परंतु अपघाताने ते पूर्णतः धास्तावले होते. सदर गाडीला कोणी ओळखत असेल तर आपण पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वणी पोलिसांनी गाडी जप्त केली असून आरोपींचा शोध घेत आहे.
वणी वरोरा रोडवर दररोज संध्याकाळी अनेक युवक रेसर बाईक चालवून दहशत माजवत असतात. यावर वेळीच आवर घालणयासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. वणी शहरात यापूर्वी सुद्धा नांदेपेरा रोडवर बाईक स्वाराने धडक दिल्याने एका महिलेला प्राण गमवावे लागले होते.