वाळू टिप्पर पकडले, मारेगाव व वणी महसूल पथकांची संयुक्त कारवाई…
महसूल प्रशासनाची रेती माफीयांनी उडविली झोप..
आनंद नक्षणे- मारेगाव : अवैध रेती भरलेले टीप्पर मारेगावकडे निघालेले असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वनोजा देवी फाट्यावर सोमवारी रात्री कारवाई करीत अवैध रेती भरलेला टिप्पर तहसील कार्यालयासमोर उभा करण्यात आला आहे.
रात्री अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर नजर ठेवण्यासाठी तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळाधिकारी, तलाठी यांचे पथक नेमले आहे. मात्र तरीही तालुक्यातील सर्वच घाटातून अवैध वाळू माफियांच्या माध्यमातून उपसा रात्रीच्या अंधारात सुरु आहे.दरम्यान सोमवारी रात्री अवैध वाळू उपसा करून टिप्पर मारेगावकडे जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना समजली असता वनोजादेवी फाट्यावर सदरील टिप्पर (क्र. एम. एच. २९ बीई ९९९८) पकडला. ही कारवाई प्रभारी तहसीलदार रामगुंडे, वाणीचे नायब तहसीलदार खिरेकर, तलाठी गाजुसिंग गुनावत, गजानन वानखेडे एस सी कुडमेथे,विवेष सोयाम, मंगेश बोपचेसह आदींनी ही कारवाई केली. या टिप्परमध्ये तिनं ते चार ब्रास जवळपास वाळू आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील वणी तालुका, मारेगाव तालुका व झरी तालुक्यात फार मोठ्या प्रमाणत रेती साठे उपलब्ध आहे . वाळू माफिया हे दिवसा रात्री सुट्ट्यांच्या दिवसी जसे मिळेल त्या पद्धतीने रेती चोरून नेतात हे सर्वश्रुत आहे. महसूल प्रशासन व वाळू माफिया यांचे चोर शिपायाचे नाते असल्याने , महसूल प्रशासनाचे झोप मात्र नक्कीच उडाली आहे यात शंका नाही.
अहेरी बोरगाव या घाटा वरून निश्चितच कधी झाली नसेल एव्हढ्या मोठया प्रमाणात रेती तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर व एका प्रतिष्ठित वृत्तपत्रातून मोठमोठ्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या त्यात स्पष्ट महसूल प्रशासनाला छायाचित्रासह पुरावे देण्यात आले. एका राजकीय पक्षाने दोन दिवसाच्या आत हे सर्व प्रकार थांबण्याचा अल्टिमेटम सुद्धा केला होता, परंतु आज रोजी सुद्धा या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे.