दातृत्च व मातृत्वाचा प्रांजळ झरा म्हणजे सीमाताई.
स्वकमाईतून सातत्याने समाजकार्यावर करोडो रुपये खर्च करणारे वणीतील सुपरहिरो विजय चोरडिया.
राजू तुरणकर — वणी
जिथे दान देण्याची सवय असते, तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते असेच वणीतील एक सुपरिचित जेष्ठ समाजसेवक व वणीचे भूषण विजयभाऊ चोरडिया यांनी श्री विनायक मंगल कार्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्ताने घराची जबाबदारीही उत्तमपणे सांभाळून सामाजिक कार्य करणारे वणी शहरातील चोरडिया परिवार खऱ्या अर्थाने ‘ सुपरहिरो’ आहेत. माणुसकी जपणारी माणसे व सामाजिक कार्य करणारे विजय चोरडिया यांची धर्मपत्नी सुद्धा दातृत्वाचा व मातृत्वाचा प्रांजवळ झरा असलेल्या सिमाताई चोरडिया यांनी नगर परिषद प्राथमिक शाळा क्र ९च्या विद्यार्थ्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. विद्यार्थ्यांना नेण्यासाठी ॲटोची व्यवस्था केली. आईच्या मायेने सर्व स्वतः च्या हाताने खाऊ घातले. प्रेमाने त्यांची विचारपूस केली. अतिशय प्रेमळ, दातृत्वाने केलेल्या आदरातिथ्याने मुले भारावून गेली. विशेष म्हणजे मागील वर्षापासून या शाळेचे पालकत्व स्वीकारल्याने विद्यार्थ्यांना ड्रेस, शूज, पाटी, पेन पासून सर्व पद्धतीचे जेवण हा उपक्रम सिमाताई सातत्याने राबवत असल्याने त्यांना मातृत्वाचा प्रांजवळ झरा हे संबोधन तंतोतंत लागू पडते.
या उपक्रमामुळे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका वेणुताई कोटरंगे यांनी शाळेच्या वतीने सिमाताईचे आभार मानले.