मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
मारेगा व तालुक्यातील मार्डी येथे आयोजन गरजवंतानी सहभागी होण्याचे आवाहन.
राजू तुरणकर – संपादक.
वणी:-स्व.पारसमल चोरडिया फाऊंडेशन वणी यांच्या विद्यमाने विजय चोरडिया यांच्या सामाजिक दायीत्वातुन कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम व चोरडिया हॉस्पिटल, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने,४ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते ०४ वाजेपर्यंत त्रिमूर्ती मंगल कार्यालय मार्डी येथे मोफत नेत्र तपासणी, शत्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आहे.
तरी गरजु रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.