सामाजिक कार्यातून जनमानसांच्या ह्रदयात स्थान निर्माण केलेले विजय चोरडिया यांची वणी विधानसभा करीता दावेदारी..
विजय चोरडिया यांच्या प्रबळ दावेदारी ने भाजपात स्पर्धा, आज पुण्यात महत्वपूर्ण बैठक…
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर
वणी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व दातृत्वाचे धनी म्हणून जनमानसात ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया हे आता विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राजकारण, समाजकारणात असून पक्षाने विश्वास टाकला तर निवडणुकीत उभे राहणार, अशी माहिती त्यांनी २० जुलै रोजी विनायक मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषदेत घेवून आपला दावा केला असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यां सोबत आज पुणे येथे महत्वपूर्ण बैठक असल्याचे सांगितले.
वणी विधानसभा क्षेत्रात माझे अविरत सामाजिक कार्य सुरु आहे. या माध्यमातून तिन्ही तालुका क्षेत्रात दांडगा जनसंपर्क स्थापित झाला आहे. सर्व क्षेत्रातील उपक्रम व सर्व स्तरातील उपक्रम राबवत असल्याने आज सर्व जातीधर्म आणि सर्वच स्तरातील लोकांशी वैयक्तिक संबंध प्रस्तापित झाला आहे. यासह पक्षाचे विविध राजकीय उपक्रम सुरुच असतात. त्यामुळे सर्वसामान्यांचे एक नेतृत्व म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.
उमेदवारीसाठी दावा राहणार – विजय चोरडिया
पक्षात उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी गेल्या ३५ वर्षांपासून समाजकारणात असून गेल्या २० ते २५ वर्षांपासून राजकारणात आहे. माझे निस्वार्थ अविरत सामाजिक व राजकीय कार्य व जनसामान्याची प्रश्ने व अडचणी समजून घेण्याची बाजू असल्यामुळे मी एक उमेदवार म्हणून सक्षम पर्याय भाजपकडे आहे. त्यामुळे पक्ष माझ्याबाबत नक्कीच विचार करेल, अशी मला आशा आहे.
विविध क्षेत्रात भरीव कार्य
कामगारांच्या आदोलनापासून विजय चोरडिया यांची राजकारणात सुरुवात झाली. त्यानंतर विविध उपक्रम, आंदोलन त्यांच्याद्वारे करण्यात आले आहे. आजपर्यंत अगणित आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांनी केले. हजारो गंभीर रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी त्यांनी घेतली. शेकडो अपंगांना त्यांनी व्हिलचेअर वाटप केले. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात त्यांच्या मदतीने वाचनालय व अभ्यासिका सुरु झाली आहे. पूरग्रस्तांना सर्व मदत त्यांनी केली आहे. खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले. याशिवाय सर्व धार्मिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.
विजय चोरडिया यांच्या प्रबळ दावेदारी मुळे भजपात उमेदवारीवरून प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून आज पुण्यात महत्वपूर्ण बैठक करीता ते रवाना झाले आहे.
पत्रकार परिषदेत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपचे कार्यकर्ते, विजय चोरडिया यांचे समर्थक उपस्थित होते.