कलेला सामाजिक्तेची जोड देणारे प्रसिद्ध डॉ विनोदकुमार आदे.

0
109

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे
————————————–
शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.
————————————–

लोकवाणी जागर

एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा मारेगांव तालुक्याचा सुपरस्टार कलाकार डाॅ. विनोदकुमार हा जीवनाचा खडतर मार्गाने चालत आपल्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातून जीवनाचा गुळगुळीत डांबर रस्ता बनविणारा डाॅ. विनोदकुमार आज कलेला कमर्शियल उद्देशाने घेऊन सेलिब्रिटी जीवन जगतोय, आज घडीला अंगी असलेल्या कलेला सामाजिकतेची किनार असल्याने समाजाती अनिष्ट प्रथा शेतकरी समस्या, आमचे शैक्षणिक धोरण, राजकीय चुकीच्या धोरणाचा समाचार घेत आसुड ओढण्याचा प्रयत्न करित व्यवस्थेला जाग करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याने डाॅ. विनोदकुमार सदाशीव आदे सर्वसामान्य नागरीकात प्रसिद्ध आहे, आज २६ जुलैला त्यांचा जन्मदिवस असून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी उपेक्षा त्याच चाहते मनोमन करित आहे .
रांगोळीकार, चित्रकार, मुर्तिकार, शिल्पकार,गितकार, पटकथाकार, नकलाकार, कवी, लेखक, पत्रकार, शंभर पेक्षा जास्त कला असलेले डाॅ. विनोदकुमार आदे हे एक हळव्या मनाच व्यक्तीमत्व असून ते आई वडीलाची सेवा सुद्धा श्रावणबाळा सारखा करीत आहे. आज च्या परिस्थिती केवळ आईवडीलाच्या प्रति प्रेमाचा देखावा करणारे असंख्ये अपत्ये समाजात आहे मात्र त्यापैकी अनेकाची म्हातारे आईवडिल वृद्धाश्रमात जीवन कंठत आहे मात्र डाॅ. विनोदकुमारचे वडील कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचा सामना उपराजधानीतील रुग्णालयात करित असताना, वडीलांसाठी सर्व कार्यक्रमे रद्द करून वडिलाच्या प्रकृतीवर डोळ्यात तेल टाकून सुश्रृशा करणारे डाॅ. विनोदकुमार खऱ्या अर्थाने आमचा श्रावण ठरतोय अशा शतकी कला अंगी असणार्‍या डाॅ. विनोदकुमार आज आजारी वडीलाच्या सेवेत रुजु असून त्याला अंगी असणारी कला स्वस्थ बसू देत नाही. तो वेळेत वेळ काढून ठरलेले कार्यक्रम सादर करून कार्यक्रम संपताच आजारी वडीलाच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवण्यासाठी नागपूर गाठतोय अशा हळव्या आईवडील प्रेमी कलाकार यांच्या कला व वडीला प्रती असलेल्या आपुलकीला सलाम.

वडिलाप्रति कृत्यज्ञता व त्यांच्या बलिदानाचे उपकार बाळगत आगष्ट महीण्यात डाॅ. विनोदकुमार आदे यांचा दुसरा काव्य संग्रह प्रकाशित होणार आहे
काव्य संग्रहाचे नाव बाप असून पहीले काव्य संग्रह टुकार हे प्रकाशित आहे.

जर बालपणी आई वडीलांनी उन वारा पाऊस पाणी व आग यापासून लेकराच संरक्षण केले नसत, शाळेत नाव नोंदवल नसत तर मी हुशार झालो नसतो. असे ते आवर्जून सांगतात, त्याच्या कार्याची प्रचिती बाप ह्या काव्य संग्रहात प्रत्येक कवितेत रसिकांना पाहावयास मिळणार आहे.

आई वडीलाच्या प्रेमातून शिकवणीतून आज कलाक्षेत्रात उत्कर्षाचा झेंडा लावणारे डाॅ. विनोदकुमार यांचा जन्मदिवसा च्या निमित्ताने लोकवाणी जागर परिवाराकडून मंगलमय आयुष्याच्या अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here