धक्कादायक बातमी… पाटाळा पुलावरून वर्धा नदीत उडी घेत मुलीची आत्महत्या

0
3779

मारेगाव च्या मुलीची पाटाळा पुलावरून वर्धा नदीत उडी घेत आत्महत्या.

शोध मोहीम सुरू… पुलावरील सिसिटीव्ही फुटेज मध्ये उडी घेतांना कैद.

आई,वडिलांच्या मृत्यू नंतर थोरला मुलगा पडला एकटाच.

आनंद नक्षणे : मारेगाव येथील माधुरी खैरे या मुलीने आई-वडिलांच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या विवंचनेतून काल पाटाळा येथील वर्धा नदीत पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

शिक्षक पेशातील आईवडील दहा वर्षा पूर्वी वडिलांचे हृदयविकाराने निधन. मुलगा, मुलगी अन आई जीवन जगत असताना गेल्या मार्च महिन्यात कचरा जाळतांना आईचाही मृत्यू झाला. दोघेच बहीण भाऊ मातृपितृ हरव्हिल्यानंतर जीवन व्यथित करीत असताना नानाविध प्रश्न समोर मागे टाकत मात्र एकांतवासाचे प्रश्न मुलीच्या आवाक्याबाहेर गेले. अन तीने टोकाचे पावले उचलत थेट पाटाळा वर्धा नदी वर जात भर दुपारी उडी घेत असल्याचे पुलावर लावलेल्या सिसिटीव्ही फुटेज स्पष्ट झाल्याने ही धक्कादायक बातमी समोर येताच संपूर्ण मारेगाव शहर हादरले आहे.

मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 5, घरकुल कॉलनी येथे वास्तव्यात असलेले अरुण व उषाताई खैरे शिक्षक दाम्पत्य. यांच्या संसारवेलीवर शिक्षित मुलगा अन मुलगी. वडील अरुण खैरे यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. तर जि. प. शाळेच्या शिक्षिका उषाताई खैरे ह्या मागील मार्च मध्ये केरकचरा जाळतांना पन्नास टक्के भाजल्या. दीर्घ उपचारांनंतर त्यांचेही दीड महिन्यानंतर निधन झाले.
दोघेच भाऊ यश अन बहीण माधुरी मातृपितृ विना असतांना 28 वर्षीय माधुरी ही डी. फॉर्म झाली होती.काल शुक्रवारी सकाळी दहा वाजता वणी कॉलेज ला जात असल्याची भावाला सूचना करीत वणीवरून ऑटोरिक्षात बसून वरोरा मार्गे निघाली.दुपारी साडेबारा वाजताचे सुमारास पाटाळा वर्धा नदी जवळ माधुरी हिने थांबा घेतला.काही वेळात माजरी येथील एक दाम्पत्य ‘त्या’ ठिकाणी थांबले असता त्यांना मोबाईल, पर्स व चप्पल आढळून आली. यावेळी माधुरी हिच्या मोबाईलवर फोन आला असतांना घटनास्थळवरील हकीकत नातेवाईकांना विषद केली. अन नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेत सिसिटीव्ही फुटेज तपासा अंती माधुरी ही वर्धा नदीत उडी घेत असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, एकांतवासाची संधी साधत अचानक माधुरीने तुडुंब भरलेल्या नदीत का उडी घेतली ? याबाबतचे कारण अद्याप अस्पस्ट कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here