शाळकरी विद्यार्थी ऑटो पलटी, एक इसम ठार, चार विद्यार्थी जखमी.

0
434

शाळकरी विद्यार्थी ऑटोचा अपघात १ इसम ठार, तिन ते चार विध्यार्थी जखमी.

रफ ड्रायव्हिंग मुळे अपघात, बेशिस्त वाहतूक पोलिसांच्या अवाक्याबाहेर.

राजू तुरणकर— वणी

तालुक्यातील रांगणा नांदेपेरा रोड वर प्रवाशी घेऊन जात असलेल्या शाळकरी विद्यार्थी ऑटोचा अपघात होऊन एक इसम ठार झाल्याची घटना आज बुधवार दिनांक ४ ऑक्टोंबरला सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की,शेलु (खूर्द) येथील बरटकर हे सकाळी एम.एच.२९ व्हि.८१३७ क्रमांकाचे ऑटोत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्रवाशी घेऊन वणी कडे निघाला असता रांगणा गावाजवळ ऑटोपलटी झाला. त्यामध्ये गणपत सातपुते ४२ वर्ष रा. शेलु असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. घटनास्थळी रांगणा गावातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना वणी येथील एका खाजगी दवाखान्यात आणले आणी नंतर ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.सर्व विद्यार्थ्यांवर वणी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.

वणी शहरात टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आजूबाजूला पोलिसांनी वरोरा कोरपना ऑटो पॉईंट आखून दिले आहे. राजूर मारेगाव चालणारी ऑटो बस स्टँड ते गांधी चौक फेऱ्या मारत असतात. यामुळे या परिसरात दररोज किरकोळ अपघात होत असतात. वणी वाहतूक पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. शासनाचा महसूल वाढवा म्हणून वणी वाहतूक पोलीस या होणाऱ्या अपघाता कडे दुर्लक्ष करीत असते. त्यामुळे जनतेने रस्त्यावर चालताना ऑटो पासून सावध रहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here