क्रिडा स्पर्धा झाल्याचं नाही, मात्र लाखो रुपये खर्च.
पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अजब कारभार. आयुक्तांचे चौकशीचे आदेश.
राजू तुरणकर— वणी.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत
दिनांक 11/10/2022 ते 13/10/2022 या कालावधीत यवतमाळ तालुक्यातील चीचघाट येथे आदिवासी मुला-मुलींचे क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या उद्घानप्रसंगी शो स्पर्धा सुरू असताना पावसाला सुरुवात झाली तर हा पाऊस सतत तीन दिवस असल्यामुळे, कोणतेही खेळ स्पर्धा झाल्या नाही व सर्व मुले कर्मचारी त्याच दिवशी वापस गेले. त्यामुळे क्रीडा स्पर्धा न घेता, ज्या झाल्याचं नाही त्या झाल्या असे दाखवून लाखे रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याची गंभीर तक्रार आदिवासी समाजाचे जयपाल मेश्राम यांनी सहायक आयुक्त अमरावती यांचे कडे केली होती.
या प्रकरणी सविस्तर चौकशी करून बिल सादर करून घेणारे विश्रांत जामीनकर निर्माण पुरवठा लिपीक हे आर्थीक देवाण घेवाण करून, निविदा समितीचे नाव पुढे घालून पदाचा दुरुपयोग केले प्रकरणी सत्यता पडताळून प्रकरणी चौकशी करण्यात यावी या अनुषंगाने सहायक आयुक्त अमरावती यांचे चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश धडकल्याने प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे खळबळ उडाली आहे. सदर लिपिक आठ दिवसापासन कार्यालयातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक माशे गळी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.