वणी लायन्स हायस्कूलमध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा

0
49

वणी लायन्स हायस्कूलमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा.

लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या हस्ते तथा आमदार संजीव रेड्डी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व वृक्षारोपण.

राजू तुरणकर – संपादक 

वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात लायन्स क्लब, वणीचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हस्ते, वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार तथा शाळेचे अध्यक्ष  संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थीतीत 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी शाळेचे उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, सचिव लायन सुधीर दामले, कोषाध्यक्ष लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक लायन महेंद्र कुमार श्रीवास्तव, क्लबचे सचिव लायन किशन चौधरी, लायन डॉ. के. आर. लाल, लायन पुरूषोत्तम खोब्रागडे तसेच अकॅडमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे, विदयार्थी व पालक उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विध्यार्थ्यांनी देशभक्ती पर समुहगाणे व नृत्ये सादर केली, मृण्मयी गोवारदिपे, स्मिरल डहाके, नैतिक ढुमणे, समृध्दी भोयर, मिनल भोस्कर या विदयार्थ्यांनी स्वातंत्र्यदिना निमित्य उत्स्फूर्त भाषणे दिली. या प्रसंगी लायन राजाभाऊ पाथ्रडकर, आमदार श्री. संजीव रेड्डी बोदकुरवार, श्री सुधीर दामले, श्री चंद्रकांत जोबनपुत्रा, व श्री महेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी मनोगत व्यक्त करून विदयार्थ्यांना स्वातंत्रदिनाचे महत्व विशद केले तसेच विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन केले या नंतर लायन क्लब वणीच्या वतीने शाळेच्या आवारात लायन्स क्लबचे पदाधिकारी व अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच 2024 या इयत्ता दहावी बारावी व पाचवी ते आठवी पर्यंतच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्तविक सौ. चित्रा देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. सोनाली काळे व सौ. मुग्धा खानझोडे यांनी केले तर सौ. मनिषा ठाकरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here