आदिवासी वसतिगृह बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!
मुजोर लाल फीतशाहीच्या अडेल तट्ट धोरणात अडकल्या भोजन निविदा प्रक्रिया… राजू तुरणकर यांचा आरोप.., दोन दिवसात वस्तीगृह चालू न झाल्यास प्रकल्प कार्यालयाला घेराव.
आनंद नक्षणे
वणी येथील शासकीय आदिवासी वसतिगृह अजूनही बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी हिरमुसला आहे. मागील दोन महिन्यापासून शाळा महाविद्यालये चालू होऊन नियमित अभ्यास वर्ग होत आहे. मात्र तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी मुलां-मुलींसाठी वसतिगृह अद्यापही चालू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तात्काळ ही वसतिगृह चालू करावीत अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.
वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी शहरांत किंवा तालुक्याच्या ठिकाणी येतात. अशा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत निवारा मिळून शांततापूर्ण वातावरणात शिक्षण घेता यावे याकरिता शासकीय आदिवासी वसतिगृह चालवली जातात. मात्र, शाळा – महाविद्यालये सुरू होऊनही वसतिगृह चालू न झाल्याने ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे.
अद्यापही वसतिगृह चालू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. वणी मारेगाव तालुक्यातील शासकीय वसतिगृह तातडीने सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
मुजोर लाल फितशहीच्या अन्यायकारक प्रस्ताव तसेच अडेल तट्टू धोरणामुळे पांढरकवडा प्रकल्प कार्यालयातील भोजन निविदा प्रक्रिया रडखडल्याचे बोलले जात आहे. निविदा प्रक्रिया सांभाळणारा कर्मचारी मागील अनेक वर्षापासून एकच टेबल सांभाळत असल्यामुळे त्याच्या मनमानी कारभारामुळे वसतिगृहातील भोजनाचा प्रश्न ऐरणीवर पडला असल्याचे तर तो कर्मचारी स्वतः ला प्रकल्प अधिकारी समजत असल्याचे काही कर्मचारी दबके आवाजात बोलत आहे.
दोन दिवसात वस्तीगृह चालून झाल्यास,व मुलांचे शैक्षणिक नुकसान, पापाचे धनी कोण… याचा जॉब विचारण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे घेराव घालण्याचा इशारा राजू तुरणकर यांनी दिला आहे.