खळबळ जनक घटना मारेगाव शहरात युवकाची वाढदिवशी आत्महत्या.

0
639

खळबळजनक बातमी…..   स्थानिक मनोरंजन क्लब मध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट….

वाढदिवसाच्या दिवशी जीवन संपविण्याचा तरुणाने घेतला आत्मघाती निर्णय… सर्वत्र हळहळ.

आनंद नक्षणे बातमीदार मारेगाव….

मारेगाव शहरात वाढदिवसाच्या दिवशीच एका ३४ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची  घटना उघडकीस आली आहे. नविन मोतीगिरी बामणे (हल्ली मुक्काम .मारेगाव ) असे आमहत्या करणाऱ्या युवकाचे नांव आहे. नविन हा मनोरंजन क्लब येथे कामगार म्हणून काम करत होता. रविवार ( दि.१ सप्टेंबर ) रोजी दुपारी दोनच्या वाजता दरम्यान ही घटना उघडकीस आली.

नविन याने काम करीत असलेल्या मनोरंजन क्लबच्या रूम मध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा आज वाढदिवस होता. वाढदिवसांच्या दिवशी आत्महत्या केल्याने मारेगाव शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्यांचे कारण सध्या तरी समजू शकले नसुन त्याच्या पाठीमागे आई, पत्नी एक मुलगी,दोन विवाहित बहिणी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here