वणी विधानसभेचे प्रबळ दावेदार संजय खाडे यांचा आता महिला सक्षमीकरणावर जोर..
बचत गटांना कर्ज पुरवठा करून लघुउद्योग निर्माण करून महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न…
वणी विधानसभेचे प्रबळ दावेदारी असलेले उमेदवार संजय खाडे यांची सर्वच क्षेत्रात घोड दौड सुरू असताना आता महिला सक्ष्मीकरणासाठी विविध उपक्रम.
राजू तुरणकर वणी:- होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वच पक्षा कडून अनेक उमेदवार आपापली दावेदारी उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे रेटून धरत पाठपुरावा करीत आहे. यात मागील अनेक वर्षापासून संजय खाडे हे विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षा संजय खाडे यांच्या कडून वाढल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. आता संजय खाडे यांच्या पत्नी संगीता संजय खाडे यांनी सुद्धा कर्तव्य पार पाडत भाऊंच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी झाल्या आहेत. प्रबळ दावेदारी विधानसभेतील लोकांचा वाढलेला कौल पाहता त्यांनी महिला सक्ष्मीकरणासाठी विविध उपक्रम राबवून महिलांना परवलंबनातून स्वावलंबनाकडे जाण्याकरिता स्वेच्छेने सहमतीने एकत्र येऊन केलेला गट म्हणजे स्वयंसहायता बचत गट निर्माण केले जात आहे. यासाठी दारिद्र रेषेखालील महिलांना पहिले प्राधान्य देण्यात आले आहे.
महिलांना आर्थिक क्षेत्रात विकासाच्या संधी उपलब्ध करून देत पुरुषांच्या बरोबरीने छोटे उद्योग, व्यवसाय करता यावे म्हणून संजय खाडे यांच्या तर्फे महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवल्या जात आहे.याचाच एक भाग म्हणून महिला बचत गटांना कर्ज वाटप चा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी वणी येथे मारेगाव ( कोरंबी ) व शिरपूर येथील 40 महिलांना कर्ज वाटप करण्यात आले.
संगीता संजय खाडे व धंनजय संजय खाडे यांच्या हस्ते महिलांना कर्जाची रक्कम सुपूर्द करण्यात आली . सगीता खाडे यांनी गृह , लघु उद्योगासाठी यांचा महिलांना फार मोठा फायदा होईल, गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होईल असा आशावाद व्यक्त करून पूढील वाटचालीसाठी महिलांना खूप शुभेच्छा दिल्या….