खळबळजनक घटना….नीट ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीने सूसाईड नोट लिहून, चित्रफीत बनवून केली आत्महत्या…
मारेगाव च्या विद्यार्थिनी ची चंद्रपूरच्या खाजगी वसतिगृहात आत्महत्या….
आनंद नक्षणे – मारेगाव.
मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील 17 वर्षीय विद्यार्थिनीने चंद्रपूर येथील वसतीगृहात गळफास घेत जीवनाचा अखेर केल्याची खळबाळजनक घटना बुधवारला संध्याकाळी सात वाजताचे दरम्यान उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सातत्याने आत्महत्येचे पाऊल उचलणाऱ्या युवक, युवतीच्या निर्णयाने मारेगाव तालुका प्रभावित होत चिंतेचे सावट पसरत आहे. आत्महत्येच्या सातत्याने तालुक्यात पुरती खळबळ उडाली आहे.
प्रांजली हनुमंत राजुरकर रा. गोंडबुरांडा (मारेगाव)असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्रांजली ही चंद्रपूर येथील रामनगर जिल्हा क्रीडा संकुलन परिसरात असलेल्या खासगी “इन्स्पायर” शिकवणी मध्ये ‘नीट’ ची तयारी करीत होती.आत्महत्येपूर्वी प्रांजली हिने सुसाईड नोट लिहीत “आई, बाबा सॉरी. मला अभ्यासाचे टेन्शन आले आहे त्यामुळे मी जगाचा निरोप घेत आहे. अशा आशयाची चिठ्ठी लिहून तिने आत्महत्या केली. दरम्यान, तिच्या मोबाईलमध्ये आत्महत्येपूर्वीची चित्रफितही आढळून आली असल्याची पोलीस सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.
चंद्रपूर येथे शवविंच्छेदनानंतर मृतदेह गोंडबुरांडा येथे आणून अंतिम संस्कार करण्यात आले.
प्रांजली हिच्या या आत्मघाती निर्णयाने परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. तिच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ आहे.