महेश आत्राम बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी.

0
145

महेश आत्राम यांची बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वणी विधानसभा अध्यक्ष पदी.

 

वणी : दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधनात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना आणि त्या संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या आदेश प्रमाणे वणी येथील युवा नेतृत्व महेश अत्राम यांची वणी विधानसभा अध्यक्ष पदावर बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डॉ. सुखदेव कांबळे यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मान केला.

शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा  इंदिरा बोंदरे, समशेर सिंग भोसले फासे पारधी संघटनेचे विलास पवार यांनी महेश अत्राम यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या कार्य पद्धतीवर अभ्यास करुन संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या सनदशिर व संविधनात्मक पद्धतीने सुरू असलेले कार्य गतिमान करण्यासाठी मी संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्य करणार असुन मला बिगर सातबारा शेतकरी संघटनेत भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली, निश्चित स्वरूपात संधीच सोन करुन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया महेश अत्राम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here