अॅड. पूजा मत्ते सुवर्ण पदकाने सन्मानित.
मास्टर ऑफ लॉ मध्ये सर्वाधिक मार्क, गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सन्मान.
राजू तुरणकर _संपादक
वणी : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा 11 वा आणि 12 वा दीक्षांत समारंभ 2 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन हे होते.
या समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, प्रमाणपत्रे, पीएचडी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर येथील विद्यार्थीनी पूजा देवराव मत्ते रा. वनोजा देवी (ता. मारेगाव) यांनी (LL. M) मास्टर ऑफ लॉ मध्ये सर्वांधिक मार्क्स घेऊन मेरिट मध्ये आल्याबद्दल दिनांक 2/10/2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे झालेल्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक (गोल्ड मेडलिस्ट) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या समारंभात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे डीन आणि विद्यार्थी उपस्थित होते.