ग्रामसेवक व चपराशी यांना निलंबित करण्याची मागणी.
भिवापूर व गांगापूर येथील गुरुदयाल सिंग व नागरिकांची हिंगणघाट तहसीलदार गटविकास अधिकारी यांना निवेदन.
सचिन महाजन प्रतिनिधी हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर व गांगापूर गट ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्या कडून प्रशासकीय यंत्रणेचा दुरूपयोग मनमानी कारभाराला त्रस्त होवून नागरिकांनी गट विकास अधिकारी, तहसीलदार , उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी गुरुदयाल सिंग वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार यांच्याकडून या बेजबाबदार कर्मचाऱ्यांना निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भिवापूर गंगापूर गट ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून नागरिकाची सर्रास लूट सुरू आहे. ग्रामपंचायत मधले कर्मचाऱ्यांचे अत्याचार गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे खुलेआम चपरासी कोणत्याही शासकीय कामाकरिता पैशाची मागणी करत आहे पैसे द्या तर तुमचे काम करेल असे म्हणून लाच घेणे सुरू आहे. घरकुल या प्रकरणात हा सगळा प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी केलेले संडासची व विहिरीची व घरकुलाची योजना या सर्व योजनेमध्ये पैसे काढून देण्यासाठी.५००० हजार रुपये कमिशन सरळ लाच घेणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून सुरू असल्याच्या आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
संदीप खंडाळ हा ग्रामपंचायत चपरासी, खुलेआम दादागिरी करतो व मनमानी कारभार करत नागरिकांना कोणतेही ग्रामपंचायतचे काम करण्याकरिता लाच स्वरूपात पैशाची मागणी करतो, सर्व ग्राम पंचायत चे पदाधिकारी व सचिव यांच्या सहमतीने हा प्रकार सुरू आहे. ग्रामपंचायत दहा ते पंधरा दिवसातून एक दिवस उघडली जाते व ज्या नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये अर्जंट काम पडले त्यांनी कुठे जायचे, कोणाकडे जायचं जर नागरिक गट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काही कार्यालय काम येऊन गेले तर तेथील चपराशी संदीप खंडाळ हा सर्व लोकांना दिवस सांगतो की ३ दिवस ४ दिवसानंतर नंतर घरी बोलावतो आणि पैशाची लाच स्वरूपात मागणी करतो, कार्यालयीन पदाधिकारी सचिव व अन्य लोक पंधरा दिवसातून एकदा स्व मताने येतात व जातात. कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. शासन यांना घरी बसायचं पगार देत आहे का हा प्रश्न निवेदनातून विचारण्यात आला आहे.
भिवापूर व गंगापूर गट ग्रामपंचायत मध्ये पाच वर्षापासून लाईट बंद आहे हे कर्मचारी संदीप खंडाळ यांनी लाईव्ह कॅमेरासमोर स्वतः सांगितले व ग्रामपंचायत येथे लाईन कापण्यात आली आहे ही परिस्थिती विजापूर गट ग्रामपंचायतची होऊन बसली आहे.
महत्त्वाचं म्हणजे एक की, ग्रामपंचायतला सर्व कागदपत्र बुक्स व सर्व रेकॉर्ड कार्यालयाचे महत्त्वाचे लेखी कार्यालयीन दस्तावेज हे सर्व कर्मचारी संदीप खंडाळ यांच्या राहते घरी सापडले. पाणीपुरवठाच्या नावाखाली घाण पाणी नागरिकांच्या घरी व नळात पोचवले जात आहे. कर्मचारी संदीप खंडाळ व राजू मोहनकर हे दोन चपरासी कार्यरत असून यांना कितीदा लोकांनी व नागरिकांनी सांगितले हे पाणी खूप गढूळ येतात तर हे त्यांना उडवाउडवीची उत्तर देतात की हे आमचे काम नाही प्यायचे असेल तर प्या नाहीतर नका पिऊ चार ते पाच डेंगू पेशंट या पाण्यामुळे हॉस्पिटल मध्ये आहे व बाकी नागरिकांना काही झाले तर याची जबाबदारी कोण घेणार. जर काही जिवाने झाली तर कोण जबाबदार राहणार, आणखी एक म्हणजे घर कर ज्या लोकांकडे थकीत आहे हे त्या थकीत रक्कम ची त्यांना नोटीस देत नाही व वसुली सुद्धा करत नाही तसेच रक्कम मोठी असेल तर त्यांना सुलभ हप्ता मार्फत वसुली करण्यात यावी परंतु तेव्हा त्या नागरिकाला अर्जंट काम येते तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या समोर येतो व त्या वेळेवर तो नागरिक असमर्थ होतो. त्याचे काम केल्या जात नाही व त्याला पूर्ण रक्कम आत्ताच जमा करा नाहीतर लाच मागण्यात येते.
या सर्व प्रकाराला त्रस्त होवून गावकऱ्यांनी तहसीलदार हिंगणघाट ,गट विकास अधिकारी हिंगणघाट व जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देऊन या सर्व गंभीर प्रकाराकडे सर्वांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उच्च स्थरिय चौकशी दोषिवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामस्थांकडून मोठा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांचा सर्व सावळा गोंधळ मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आहे. गुरुदयालसिंग जुनी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार यांच्याकडे उपलब्ध आहे. निवेदन देताना समस्त गावकरी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.