मारेगाव तालुक्यात आणखी एक आत्महत्या.
मजरा येथील 32 वर्षीय युवकाने घेतले विष उपचारादरम्यान मृत्यू….
आनंद नक्षणे – मारेगाव तालुक्यातील मजरा येथील 32 वर्षीय युवकाने विषाचा घोट घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे .विष घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव रुपेश शामसुंदर आत्राम वय सुमारे 32 वर्ष असे असुन रुपेश हा तालुक्यातील कुंभा येथील मूळ रहिवासी होता.
मागील दोन ते अडीच वर्षांपूर्वी तो तालुक्यातीलच मजरा येथे आपल्या आईच्या माहेरी मामाचा गावाला राहायला आला होता. तिथे तो रोज मजुरी आणि इतर कोणतेही काम करून आपली उपजीविका करायचा.दोन वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. रुपेशचे लग्न बुटीबोरी येथील एका युवतीशी झाले होते. पाच ते सहा महिन्यांपूर्वीच त्याचा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
काल दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोज बुधवारला मार्डी येथे चौकामध्ये दुपारच्या सुमारास विष घेतले. ही गोष्ट काही लोकांना माहीत होताच त्याला त्याचे नातेवाईकांचे मदतीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला वणी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु वणी येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई असून त्याचेवर आज दि.10 ऑक्टोबरला मजरा येथे अंत्यविधी करण्यात आला.